मंदीची चिंता गेली, नोकरीची बातमी आली!!; IMF ला भारत वाटतो जगाच्या अर्थव्यवस्थेचा प्रकाश किरण!!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : विकसित देशांच्या अर्थव्यवस्था आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीचे संकट घोंगावत असताना इंटरनॅशनल मॉनिटरी फंड अर्थात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने मात्र भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाचा दर इतर विकसित आणि विकसनशील देशांच्या तुलनेत सर्वाधिक असेल असा विश्वास व्यक्त केला आहे.IMF thinks India is the light ray of world economy!!

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण उद्या १ फेब्रुवारी रोजी २०२३-२४ साठीचा अर्थसंकल्प सादर करतील. तत्पूर्वी आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर आर्थिक पाहणी अहवाल सादर करतील. या पार्श्वभूमीवर आयएमएफने व्यक्त केलेल्या विश्वासाला फार महत्त्व आहे. IMF ने भारतासाठी मोठी गुड न्यूज दिली आहे.

आयएमएफच्या मते आर्थिक वर्ष २०२३ आणि २०२४ मध्ये भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असेल. या काळात भारताच्या विकासाचा दर ६.१ % इतका असेल, तर २०२४ मध्ये ६.८ % इतका विकास दर असेल. भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असताना दुसऱ्या बाजूला जगाची अर्थव्यवस्था मात्र २०२३ मध्ये घसरण्याची चिंता IMF ने व्यक्त केली आहे.

संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासाचा दर २०२२ मध्ये ३.४ % होता. २०२३ मध्ये तो २.९ % इतका असू शकतो आणि २०२४ मधील ग्रोथ ही ३.१ % असू शकते.

IMF चे मुख्य अर्थशास्त्रज्ञ आणि संचालक Pierre-Olivier Gourinchas यांनी सांगितले की, भारतासाठी आमच्या अंदाजात कोणताही बदल नाही आला. या वर्षी भारताच्या विकासाचा वेग ६.८ % असू शकतो. पुढील वर्षी यात थोडी घट होऊ शकते आणि विकास दर ६.१ % राहिल. यात अंतर्गत गोष्टींची भूमिका महत्त्वाची असेल. मात्र जागतिक अर्थव्यवस्थेसाठी भारतीय अर्थव्यवस्थेची भूमिका महत्त्वाची असेल. भारताची अर्थव्यवस्था प्रकाश किरणांचे काम करेल.

IMF thinks India is the light ray of world economy!!

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात