‘लाच’ मागितली तर नकार देऊ नका, त्याचा व्हिडिओ-ऑडिओ पाठवा ‘; भगवंत मान यांचे पंजबिंना आवाहन


वृत्तसंस्था

नवी दिल्‍ली : ‘लाच’ मागितली तर नकार देऊ नका, त्याचा व्हिडिओ-ऑडिओ पाठवा ‘, असे आवाहन पंजाबचे नूतन मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राज्यातील जनतेला केले आहे. If you ask for a bribe, don’t refuse, send a video-audio ‘; Bhagwant Mann’s appeal to Punjab

आम आदमी पक्षाचे पहिले पंजाबी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी नुकतीच शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी भ्रष्टाचाराविरोधात मोठी घोषणा केली आहे. पंजाबच्या जनतेने मतदान करून जबाबदारी पार पाडल्याचे मान म्हणाले. आता पुढची जबाबदारी माझी आहे. आज मी भ्रष्टाचारविरोधी हेल्पलाइन क्रमांक जाहीर करत असल्याचे मान यांनी म्हटले आहे.

२३ मार्च रोजी हुतात्मा भगतसिंग यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात येणार आहे. यापूर्वी दिल्लीतील आप सरकारने लाच मागणाऱ्याचे ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगही मागवले होते. तेव्हापासून तिथे लाचखोरी संपली. यानंतर लोकांनी केजरीवाल सरकारला पुन्हा-पुन्हा विजयी करायला सुरुवात केली आहे. येत्या काळात असेच हेल्पलाइन क्रमांक आम्ही देणार आहोत. हा माझा व्हॉट्सअॅप क्रमांक असेल, असे भगवंत मान म्हणाले.

जर कोणी लाच मागितली तर नकार देऊ नका, फक्त रेकॉर्ड करा आणि माझ्याकडे पाठवा. जो कोणी दोषी असेल, त्या भ्रष्टाचाऱ्याला कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

If you ask for a bribe, don’t refuse, send a video-audio ‘; Bhagwant Mann’s appeal to Punjab

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात