HSC CBSC RESULT : उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन ! दिला मोलाचा सल्ला ; यंदाही मुलींचा सिक्सर…


यंदाच्या परीक्षेत ९९.६७ मुली तर ९९.१३ टक्के मुलं पास झाली.


सलग सहाव्या वर्षी मुलींनी बाजी मारलेली आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: CBSEचा इयत्ता १२वी बोर्डाचा निकाल लागला आहे. यंदा 99.37 टक्के विद्यार्थी पास झाले असून हा आतापर्यंतचा हायेस्ट पासिंग परसेंटेज निकाल आहे.6149 (0.47) विद्यार्थ्यांना कंपार्टमेंट कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आले आहे. या निकालानंतर पंतप्रधाननरेंद्र मोदींनी सर्व पास झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केलं आहे. HSC CBSC RESULT: PM Modi congratulates successful students! Valuable advice given; The girls’ six this year too …

इयत्ता बारावीत यश मिळालेल्या मुलांशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संवाद साधला आणि त्यांना मोलाचा सल्ला देखील दिला आहे.

नरेंद्र मोदींनी ट्विट करून मुलांचं कौतुक केलं आहे. सीबीएसई बोर्ड परीक्षेत पास झालेल्या माझ्या सर्वच मित्रांचे अभिनंदन. तसेच, उत्कृष्ट, आरोग्यदायी आणि आनंदी भविष्यासाठी शुभेच्छा. असे मोदींनी म्हटलं आहे. तसेच, ज्यांना वाटते की त्यांनी अधिक मेहनत घेतली किंवा यापेक्षाही चांगले गुण मिळवले असते त्यांनाही मोदींनी मोलाचा सल्ला दिला आहे. आपल्या अनुभवातून शिका आणि नेहमी मोठं ध्येय पाहा. एक उज्ज्वल आणि संधींनी भरलेलं भविष्य तुमची वाट पाहत आहे. तुमच्यातील प्रत्येकजण प्रतिभेचा उर्जास्थान आहे. माझ्या नेहमीच शुभेच्छा. अशा शब्दात मोदींनी कोरोना कालावधीतील निकालाकडे पाहण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिलं आहे.

HSC CBSC RESULT: PM Modi congratulates successful students! Valuable advice given; The girls’ six this year too …

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात