21 परमवीर चक्र विजेत्यांचा सन्मान; अंदमान निकोबारच्या अनाम द्वीपांना दिले सन्मानित नाम!!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देश गौरव नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त देशभर पराक्रम दिवस साजरा करत असताना केंद्रातील मोदी सरकारने अंदमान निकोबार परिसरातील 21 अनाम द्वीपांना 21 परमवीर चक्र विजेत्यांची नावे दिली आहेत. Honoring 21 Param Vir Chakra winners

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोर्ट ब्लेअरच्या सेल्युलर जेल परिसरात झालेल्या व्हर्च्युअल कार्यक्रमात 21 परमवीर चक्र विजेत्यांची नावे या द्वीपांना बहाल केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, सर्व वरिष्ठ सेना अधिकारी या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी पंतप्रधानांनी वीर सावरकरांपासून नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्यापर्यंत आणि आदिवासी वीरांपर्यंत अनेक वीरांची नावे घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. सुभाष द्वीपावर आता भव्य स्मारक साकारण्याची घोषणाही त्यांनी केली. ज्या परमवीर चक्र विजेत्यांची नावे अंदमान निकोबार समूहातील अनाम द्विपांना दिली आहेत त्यांची नावे आणि माहिती अशी :

– परमवीर चक्र का देतात?

परमवीर चक्र हा भारतीय सैन्यामध्ये युद्धकाळात दाखवलेल्या शौर्यासाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. परमवीर चक्र हे शत्रूच्या उपस्थितीत दाखवलेल्या उल्लेखनीय साहसासाठी जिवंतपणी तसेच मरणोत्तर दिले जाते.

परमवीर पुरस्काराची स्थापना 26 जानेवारी 1950 रोजी करण्यात आली व हे पुरस्कार देण्याची सुरुवात 15 ऑगस्ट 1947 पासून करण्यात आली. परमवीर चक्र हे जमिनीवर, हवेत किंवा समुद्रामध्ये शत्रू समोर असताना केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी तसेच आत्मत्यागाच्या पूर्वतयारीने दाखवलेले साहस आणि आत्मबलिदानासाठी दिले जाते.

आतापर्यंत 21 परमवीर चक्र पुरस्कार प्रदान करण्यात आले असून त्यातले 14 पुरस्कार हे मरणोत्तर आहेत. 21 पैकी 20 पुरस्कार भारतीय सैन्य तर एक वायुसेनेच्या सदस्यांस प्रदान केले गेले आहेत.

परमवीर पुरस्कार विजेते 21 जवान :

  • मेजर सोमनाथ शर्मा
  • नाईक जदुनाथ सिंह
  • सेकंड लेफ्टनंट रामा राघोबा राणे
  • नायक करम सिंह
  • मेजर पीरू सिंह
  • कॅप्टन गुरबचन सिंह
  • मेजर धनसिंह थापा
  • सूबेदार जोगिंदर सिंह
  • मेजर शैतान सिंह
  • अब्दुल हमीद मसऊदी
  • लेफ्टनंट कर्नल ए. बी. तारापोर
  • लान्स नाईक अल्बर्ट एक्का
  • फ्लाईंग ऑफिसर निर्मलजीत सिंह
  • लेफ्टनंट अरुण खेतरपाल
  • मेजर होशियार सिंह
  • नायब सुभेदार बन्ना सिंह
  • मेजर रामस्वामी परमेश्वरन
  • लेफ्टनंट मनोज कुमार पांडे
  • ग्रेनेडिअर योगेंद्रसिंह यादव
  • सुभेदार संजय कुमार
  • कॅप्टन विक्रम बत्रा

Honoring 21 Param Vir Chakra winners

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात