उत्तर दिल्लीत हॉटेल्स, रेस्टॉरंट यांना हलाल – झटका मटनाच्या पाट्या अनिवार्य; महापौरांची घोषणा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : उत्तर दिल्ली महापालिका परिक्षेत्रात हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ढाबे आणि मांसविक्रेत्यांना हलाल मटन आणि झटका मटन अशा पाट्या अनिवार्य करण्यात आल्या आहेत. महापौर जय प्रकाश यांनी हा निर्णय जाहीर केला. Hinduism & Sikhism, ‘halal’ meat is prohibited. So we approved a proposal, making it mandatory for all restaurants, dhabas & meat shops in North Delhi Municipal Corporationहिंदू आणि शीख समाजात हलाल मटनापेक्षा झटका मटन खाल्ले जाते. अनेक ठिकाणी तर हलाल मटन खाणेच निषिद्ध मानतात. त्यामुळे उत्तर दिल्ली महापालिका परिक्षेत्रात आम्ही मांस विक्रेते, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ढाबे यांना हलाल मटन की झटका मटन विक्री यांच्या पाट्या लावणे बंधनकारक केले आहे. यात धार्मिक वाद कोणताही नाही. ग्राहकांच्या मागण्या आणि सोयीचा यामध्ये विचार केला आहे, असे जय प्रकाश यांनी स्पष्ट केले.

मध्यंतरी हलाल आणि झटका मटनाचा वाद तसेच हलाल उत्पादन ब्रँडिंग यांचा वाद सुप्रिम कोर्टापर्यंत पोहोचला होता. त्यात दोन्ही प्रकारच्या उत्पादनांवर स्पष्टपणे नमूद केले पाहिजे, असा निकाल कोर्टाने दिला होता. त्यानंतर उत्तर दिल्ली महापालिकेने हलाल मटन आणि झटका मटन अशा पाट्या अनिवार्य करण्याचा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करवून घेऊन तो अमलात आणायला सुरूवात केली आहे.

Hinduism & Sikhism, ‘halal’ meat is prohibited. So we approved a proposal, making it mandatory for all restaurants, dhabas & meat shops in North Delhi Municipal Corporation

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*