भारतातील उंचीने सर्वात लहान असणारी वकील हरविंदर कौर


विशेष प्रतिनिधी

जालिंधर : 24 वर्षीय हरविंदर कौरची उंची आहेत 3 फूट 11 इंच. सध्या ती जालिंधर सेशन कोर्टामध्ये वकील म्हणून काम करते. भारतातील उंचीने सर्वात लहान असणारी ती एकमेव वकील आहे. सध्या इंटरनेटवर हरविंदर खूप जास्त व्हायरल होतेय. कारण तिची उंची नाही तर तिच्या इच्छाशक्तीमुळे.

Harvinder Kaur is the shortest lawyer in India

जेव्हा ती तीन वर्षांची झाली तेव्हा पासूनच तिची उंची वाढण्याची बंद झाली होती. बाकीच्या मुलांच्या तुलनेत तिची उंची लहान राहिल्यामुळे तिला वर्गातील मित्र मैत्रिणींकडून हरॅसमेंट सहन करावी लागली. याचा तिच्या मनावर खूप जास्त परिणाम झाला. आणि तिने शाळेत जाण्याचे बंद केले. त्यानंतर मात्र या टॉर्चर मुळे ती खचून गेली नाही. तिने आपल्यासारख्या डिसेबल मुलांच्या हक्कासाठी लढण्याचे ठरवले. आणि तिने आपले वकिलीचे शिक्षण पूर्ण केले.

इंडियन एक्स्प्रेससोबत बोलताना ती म्हणते की, मी शाळेत आपल्या मित्र मैत्रिणींकडून सहन कराव्या लागलेल्या टॉर्चरमुळे खूप जास्त दुखावले गेले हाेते. माझ्यासारखे बरेच लोक या देशांमध्ये आहेत. त्या सर्वांसाठी मी लढण्यासाठीच वकिलीचे शिक्षण घेतले आहे.


दुर्गा सन्मान : अ‍ॅड. कल्पलता पाटील-भारस्वाडकर… महिला व मुलांच्या मूलभूत अधिकारांची धगधगती मशाल!


आता ती वकील झालीय. लोकांच्या केसेस लढते. तरीही तिच्याबद्दल होणारी चर्चा थांबली आहे असे अजिबात नाही. आत्ताही जेव्हा ती कोर्टमध्ये जाते तेव्हा लोक तिच्या कमी उंची बद्दल एकमेकांमध्ये कुजबुज करताना आढळून येतात. पण आता ती अश्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिकली आहे. तिच्याकडे एक आत्मविश्वास आलेला आहे. निसर्गातः मिळालेल्या गोष्टींचा तिने स्वीकार केला आहे. आपल्या आयुष्याचा मार्ग सकारात्मक पद्धतीने जगण्याचे तिने ठरवले आहे.

Harvinder Kaur is the shortest lawyer in India

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात