गुजरातच्या मुख्यमंत्र्यांची ८५ किलो चांदीने तुला,पशुकल्याणासाठी देणार निधी

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी करुणा अभियान सुरू केले आहे. गांधीनगर येथील एका कार्यक्रमात रुपाणी यांची ८५ किलो चांदीने तुला करण्यात आली. यातून आलेली रक्कम गोशाळांना मदत म्हणून वापरण्यात येणार आहे.Gujarat chief minister weighed against 85-kgs of silver


विशेष प्रतिनिधी 

अहमदाबाद : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी गायींसाठी करुणा अभियान सुरू केले आहे. गांधीनगर येथील एका कार्यक्रमात रुपाणी यांची ८५ किलो चांदीने तुला करण्यात आली. यातून आलेली रक्कम गोशाळांना मदत म्हणून वापरण्यात येणार आहे.

रुपाणी म्हणाले, आमचे सरकार पशुधन कल्याण कार्यक्रम राबविण्यासाठी कटिबध्द आहे. गोहत्या रोखण्यासाठी आम्ही कडक कायदे केले आहे. यामध्ये जास्तीत जास्त १२ वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तुरतूद करण्यात आली आहे.रुपाणी म्हणाले,सरकारने जनावरांवर उपचार करण्यासाठी ३५० व्हॅटर्नारी व्हॅन सुरू केल्या आहेत. त्याचबरोबर गोशाळांनाही मदत दिली जात आहे. त्यामुळे गाईसाठी वेळेवर चारा पाहोचू शकतो. त्याचबरोबर पक्षांवर इलाज करण्यासाठीही अभियान सुरू करण्यात आले आहे.

करुणा अभियानांतर्गत पतंग महोत्सवादरम्यान जखमी झालेल्या पक्षांवर उपचार करण्यात येणार आहे. कोरोनावर बोलताना रुपाणी म्हणाले, कोरोनाबाबत पसरविल्या जाणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका.

कोरोनाविरुध्दच्या लढाईत उपाययोजना करताना उद्योग- व्यापार आणि रोजगारावर कोणताही परिणाम होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे.

Gujarat chief minister weighed against 85-kgs of silver

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*