मेरठचा भंगार माफिया हाजी गल्लावर चालला योगींच्या कायद्याचा दंडा; 10 कोटींची बेकायदेशीर संपत्ती जप्त; चार मुलांसह अटक


वृत्तसंस्था

मेरठ : मेरठचा भंगार माफिया हाजी नईम उर्फ हाजी गल्ला याच्याविरुद्ध उत्तर प्रदेश सरकारने मोठी कारवाई करत कायदेशीर दंडा चालवला आहे. त्याची 10 कोटींची बेकायदेशीर संपत्ती जप्त करण्यात आली असून हाजी गल्लासह त्याच्या चार मुलांना गजाआड करण्यात आले आहे. Gone in 3 hours: Stolen in Delhi, scrapped in Meerut

त्यांच्या विरोधात उत्तर प्रदेश गुंडा एक्ट तसेच राष्ट्रीय सुरक्षा कायद्याची कलमे देखील लावण्यात आली आहेत. आत्तापर्यंत हाजी गल्ला याला चोरीच्या गाड्या मोडून तोडून त्याचे स्पेअर पार्ट खुल्या बाजारात विकण्याच्या गुन्ह्यांमध्ये अनेकदा अटक झाली आहे. परंतु कायद्याच्या पळवाटा शोधून सुटण्यात त्याला आतापर्यंत यश आले होते. परंतु आता त्याच्या आणि त्याच्या मुलांना विरोधात उत्तर प्रदेश गुंडा ऍक्ट आणि राष्ट्रीय सुरक्षा कायदा यांची कलमे लागू झाल्याने त्यांना कायद्याच्या कचाट्यातून सुटणे कठीण झाले आहे मेरठचा सोतीगंज भंगार बाजार हा कुप्रसिद्ध आहे. तेथे सुमारे तीनशे दुकाने असून यापैकी 47 दुकाने एकट्या हाजी गल्ला आणि त्याच्या चार मुलांच्या नावावर असल्याचे सांगण्यात येते. अर्थात हे सगळे व्यवहार त्याने बेनामी पद्धतीने चालवले होते.



गेल्या 20 वर्षांपासून दिल्ली, उत्तर प्रदेश हरियाणा, पंजाब येथे गाड्या चोरांच्या टोळ्यांकडून तो गाड्या भंगाराच्या भावात विकत घेऊन त्याची मेरठच्या सोतीगंज भागात मोडतोड करत असे. त्यांचे स्पेअर पार्ट चढ्या भावाने देशभर खुल्या बाजारात विकत असे. 20 वर्षांत त्याने हे भंगार ते साम्राज्य उभे केले होते. यातून काही हजार कोटींची मालमत्ता त्याने तयार केली आहे. मेरठ कँटोन्मेंट परिसरात त्याच्या मालकीची 1200 यार्ड जमीन असल्याचे सांगण्यात येते. हा व्यवहार देखील बेनामी पद्धतीने झाल्याचे पोलिसांनी उघडकीस आणले आहे.

त्याच्या विरोधात कारवाई करताना 150 पोलिसांची सशस्त्र फौज सोतीगंज भंगार बाजारात हजर होती. पोलीस कारवाईची भनक लागताच भंगार बाजारातील अनेक भंगार माफिया आणि गुंड फरार झाले असून उत्तर प्रदेश पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. भंगार बाजारातले गेल्या 20 वर्षांमध्ये हजारो कोटींचा गैरव्यवहार हाजी गल्ला आणि त्याच्या चार मुलांच्या जबानीतून समोर येण्याची शक्यता आहे.

Gone in 3 hours : Stolen in Delhi, scrapped in Meerut

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात