Goa CM Oath Taking Ceremony : डॉ. प्रमोद सावंत दुसऱ्यांदा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी; कोंकणीत घेतली शपथ; विश्‍वजित राणे यांच्यासह 8 मंत्र्यांचा समावेश!!


प्रतिनिधी

पणजी :  गोव्यात भारतीय जनता पार्टीच्या शानदार विजयानंतर डॉ. प्रमोद सावंत यांनी सलग दुसऱ्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये भव्य समारंभात त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सावंत कोंकणी भाषेत शपथ घेतली. Goa CM Oath Taking Ceremony

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, भाजपशासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि गोव्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस हे व्यासपीठावर उपस्थित होते.

गोव्याची परंपरा पाळत डॉ. प्रमोद सावंत यांनी कोंकणीत शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले. सावंत यांच्या समवेत विश्वजीत राणे, सुभाष शिरोडकर, मौविन गोडीन्हों, रवि नायक, निलेश काब्रल, रोहण खौंटे, अटॉनोसियो मोन्सेरात आणि गोविंद गौड आदींनाही पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली आहे. या सर्व मंत्र्यांचे आज संध्याकाळपर्यंत खातेवाटप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच सावंत हे लवकरच कॅबिनेटची बैठक बोलावणार असून त्यात काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

आज सकाळी 11 वाजता प्रमोद सावंत यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. यावेळी त्यांच्यासह आठ मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्याला उपस्थित होते. त्यांनी सर्व मंत्र्यांचे अभिनंदन केले.

शपथविधी सोहळ्यापूर्वी पूजाअर्चा

प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळ्यासाठी भव्य स्टेज तयार करण्यात आले होते. त्यावर गोंय सरकार शपथविधी सुवाळो असे कोंकणीत वाक्य लिहिले होते. या स्टेजच्या भोवती भव्य पोस्टर्स लावण्यात आले आहेत. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जे. पी. नड्डा यांचे फोटो होते. शपथविधी सोहळ्यापूर्वी डॉ. प्रमोद सावंत यांनी घरात पूजा अर्चा केली. प्रमोद सावंत यांनी मनोभावे कुलदैवतेला साकडे घातले. त्यानंतर त्यांनी सुलभ दुसऱ्यांचा गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

Goa CM Oath Taking Ceremony

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात