Goa Budget Goa government presents budget of Rs 25,000 crore, provision of Rs 10 crore for Goshala

Goa Budget : गोवा सरकारने सादर केला 25 हजार कोटींचा अर्थसंकल्प, गोशाळेसाठी 10 कोटींची तरतूद

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी 25 हजार कोटींचे बजेट (Goa Budget) सादर केले. यात अनधिकृत घरे वैध करणे, पर्यटन क्षेत्रासाठी कर्ज, ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थयात्रा योजना, पारंपरिक व्यावसायिकांना मदत आणि एका खाण महामंडळासाठी तरतूद करण्यात आली आहे. ते म्हणाले की, राज्यात प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचे त्यांचे ध्येय आहे. Goa Budget Goa government presents budget of Rs 25,000 crore, provision of Rs 10 crore for Goshala


विशेष प्रतिनिधी

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी 25 हजार कोटींचे बजेट (Goa Budget) सादर केले. यात अनधिकृत घरे वैध करणे, पर्यटन क्षेत्रासाठी कर्ज, ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थयात्रा योजना, पारंपरिक व्यावसायिकांना मदत आणि एका खाण महामंडळासाठी तरतूद करण्यात आली आहे. ते म्हणाले की, राज्यात प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचे त्यांचे ध्येय आहे. मुख्यमंत्री सावंत म्हणाले, “हे सरकार मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडबरोबर करार करणार आहे. वाळू, दगड यासारख्या गौण खनिज उत्खननांना चालना देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. सावंत म्हणाले की, छोट्या व्यवसायांना चालना देण्यासाठीही मदत करण्यात येईल. गौण खनिजांसाठी खाणी भाड्याने देण्याची प्रक्रिया सहज करण्यासाठी राज्य सरकार गोवा गौण खनिज सवलत अधिनियम 1985 मध्ये सुधारणा करणार आहे. ते म्हणाले की, पारंपरिक वाळू उत्खननासाठी अनुदान परवानग्यांमध्येही वेग आणला जाईल.

हॉटेल्स आणि ट्रॅव्हल्स ऑपरेटर्सना लाभ

याशिवाय पर्यटन व्यवसाय सहायता योजना सुरू करण्याचे आश्वासनही सावंत यांनी दिले असून यामध्ये सर्व नोंदणीकृत हॉटेल्स आणि ट्रॅव्हल्स व टूर ऑपरेटर्सना 25 लाखांपर्यंतच्या कर्जावर व्याज अनुदान दिले जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, सरकारच्या या योजनेचा २० हजारांहून अधिक हॉटेल्स आणि एक हजाराहून अधिक टूर व ट्रॅव्हल्स ऑपरेटर्सना फायदा होणार आहे.

गोशाळा बांधण्यासाठी 10 कोटींची तरतूद

गोवा सरकारने राज्यात गोशाळा तयार करण्यासाठी 10 कोटी रुपयांचा प्रस्ताव दिला आहे. बुधवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात म्हटले की, राज्य सरकारच्या ‘भटक्या जनावरे व्यवस्थापन योजने’अंतर्गत गोशाळा उभारण्यासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद केली जाईल. सावंत म्हणाले, “भटक्या प्राण्यांची समस्या सोडवण्यासाठी गोशाळा बांधल्या जातील. याचकरिता दहा कोटींची तरतूद केली आहे.” गोव्यात रस्त्यावर भटक्या जनावरांची मोठी समस्या आहे. यामुळे अपघातही घडतात. यामागे वाहनांची वाढलेली संख्या, रस्त्यांवर प्रकाशाची समस्या अशी कारणे आहेत. याशिवाय गोवन लोकांचा शेतीमधील रस कमी असणे, हेदेखील भटक्या जनावरांच्या समस्येचे एक कारण आहे.

Goa Budget Goa government presents budget of Rs 25,000 crore, provision of Rs 10 crore for Goshala

महत्त्वाच्या बातम्या

 

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*