भारतीय रेल्वेचे महाराष्ट्रासाठी खास गिफ्ट ! जगातील सर्वात स्वस्त आणि सर्वोत्कृष्ट एसी ट्रॅव्हल ; पहा फोटोज


जीएम रवींद्र गुप्ता म्हणाले की, ‘जगातील सर्वात स्वस्त आणि सर्वोत्कृष्ट एसी ट्रॅव्हल’ प्रदान करणारे एसी इकॉनॉमी क्लासचे प्रशिक्षक आरसीएफच्या गौरवपूर्ण प्रवासातील सुवर्ण क्षण आहे. लॉकडाऊनमुळे वस्तूंचा पुरवठा न झाल्यामुळे आरसीएफच्या उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. असे असूनही, आरसीएफ प्रशासन आणि कर्मचार्‍यांनी पूर्ण वचनबद्धतेने काम केले आणि मे महिन्यात 100 पेक्षा जास्त बोगी तयार केल्या.  Gift for Maharashtra by Indian Railways; Rail Coach Factory rolls out first AC economy class coaches


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशातील पहिली एसी इकॉनॉमी क्लास बोगी यूपी आणि महाराष्ट्रातील ट्रेनमध्ये बसविली जाणार आहे.  पाच डबे मुंबई मुख्यालयासह पश्चिम रेल्वेला पाठविण्यात आले आहेत. दुसरीकडे रेल्वेला यासाठी कमी खर्च लागल्यामुळे भाड्यात कपातही शक्य होणार आहे.Gift for Maharashtra by Indian Railways; Rail Coach Factory rolls out first AC economy class coaches

रेल्वेचा वातानुकूलित प्रवासाचा परवडणारा वर्ग

कोच फॅक्टरी कपूरथळाचे जीएम रवींद्र गुप्ता आणि प्रधान मुख्य यांत्रिकी अभियंता आर.के. मंगला यांनी सोमवारी तीन स्तरीय एसी इकॉनॉमी क्लासच्या 15 डब्ब्यांना हिरवा झेंडा दाखवला आणि महाराष्ट्र उत्तर प्रदेशकडे रवाना केले. त्या डब्यांना विविध मेल व एक्स्प्रेस गाड्यांमध्ये तैनात करण्यात येणार आहे.

देशातील पहिले एसी इकॉनॉमी क्लास डबे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रालातील ट्रेनमध्ये दिसणार आहेत. डिझाइनमध्ये प्रवाशांच्या सोयी लक्षात घेता, दोन्ही बर्थजवळ फोल्डिंग टेबल्स आणि बाॅटल होल्डरसह मोबाईल फोन आणि मॅगझिन होल्डरही बसवले आहे.

यात विविध सुधारणा करण्यात आल्या आहेत. प्रत्येक बर्थसाठी वाचन दिवे व मोबाईल चार्जिंग पॉईंट देखील बसविण्यात आले आहेत. मध्यम आणि अप्पर बर्थमध्ये प्रवेश करण्यासाठी शिडीची रचना बदलली गेली आहे. यामुळे ते सुंदरही दिसत आहे आणि प्रवाशांची गैरसोय होणार नाही.

अनेक टप्प्यांच्या चाचण्यांनंतर आणि रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या परवानगीनंतर रेल्वे कोच फॅक्टरीतून 15 एसी इकॉनॉमी डबे रवाना झाले. यातील 10 डबे उत्तर प्रदेशातील प्रयागराज आग्रा आणि झांसीच्या उत्तर मध्य रेलवे विभागाला मिळणार आहेत. तसेच उर्वरित 5 डबे पश्चिम रेल्वेचं मुख्यालय असलेल्या मुंबईला मिळणार आहे.भविष्यात भारतीय रेल्वे विभाग असे आणखी 248 डबे तयार करणार आहे.

भविष्यात भारतीय रेल्वे विभाग असे आणखी 248 डबे तयार करणार आहे. या डब्यांमध्ये सामान्य डब्यांपेक्षा अधिक आसनं आहेत. जुन्या जब्यांमध्ये 64 सीट असतात तर यात 72 सीट असतील

निर्मितीसाठीचा कमी खर्च आणि वाढलेली आसन व्यवस्था यामुळे या रेल्वेत प्रवास करणं स्वस्त ठरेल असंह बोललं जातंय. रेल्वे कोच फॅक्टरीने केवळ 3 महिन्यात 10 फेब्रुवारीला या डिझाईनचा आराखडा तयार केला होता. या डब्यांची रेल्वेने 180 किलोमीटर वेगाने तपासणी केलीय.

जीएम रवींद्र गुप्ता म्हणाले की, ‘जगातील सर्वात स्वस्त आणि सर्वोत्कृष्ट एसी ट्रॅव्हल’ प्रदान करणारे एसी इकॉनॉमी क्लासचे प्रशिक्षक आरसीएफच्या गौरवपूर्ण प्रवासातील सुवर्ण क्षण आहे. लॉकडाऊनमुळे वस्तूंचा पुरवठा न झाल्यामुळे आरसीएफच्या उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. असे असूनही, आरसीएफ प्रशासन आणि कर्मचार्‍यांनी पूर्ण वचनबद्धतेने काम केले आणि मे महिन्यात 100 पेक्षा जास्त बोगी तयार केल्या.

Gift for Maharashtra by Indian Railways; Rail Coach Factory rolls out first AC economy class coaches

महत्त्वाच्य बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात