गॅस सिलिंडरच्या किमती १ एप्रिलपासून १० रूपयांनी घटविल्या; पेट्रोल – डिझेलसह इंधन दरवाढीचा ट्रेंड घसरता; किमती आणखी कमी होण्याची शक्यता

वृत्तसंस्था

नवी दिल्ली – इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने गॅस सिलिंडरच्या किमती १० रूपयांनी घटविल्या आहेत. त्यामुळे घरगुती गॅसच्या किमतीत १० रूपयांनी घट होणार आहे.  gas cylinder price cut by 10 rs in india

फेब्रुवारी महिन्यापासून पेट्रोल – डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या किमती सातत्याने वाढत असल्याने राजकीय गदारोळ होतच होता पण सामान्य माणसालाही त्याच्या झळा बसल्या. त्यामुळे १० रूपयांनी गॅस सिलिंडर १ एप्रिलपासून स्वस्त होणे, हा सामान्य माणसाला थोडा दिलासा देण्यात आल्याचे मानण्यात येते.आता गॅस सिलिंडर कोलकात्यात ८४५, मुंबईत ८१९ आणि चेन्नईत ८३५ रूपयांना उपलब्ध होईल. पेट्रोल – डिझेलच्या किमतीही फेब्रुवारीत सतत वाढत असताना गेल्याच आठवड्यापासून म्हणजे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून तीन वेळा कमी झाल्या आहेत. त्या पुढील महिन्यात आणखी कमी होऊ शकतात, असे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्याने नाव प्रसिध्द न करण्याच्या अटीवर सांगितले.

इंधनांचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात घटले आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम भारतात दिसायला सुरूवात झाली आहे. अद्याप इंधनाचे दर वाढते दिसत असले, तरी त्यांचा ट्रेंड मात्र खाली येताना दिसतो आहे, असेही त्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

gas cylinder price cut by 10 rs in india

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*