सावरकरांचा अपमान : तुषार गांधींनी राहुल गांधींचे समर्थन करताच गांधी + नेहरूंचे माफीनामे व्हायरल


प्रतिनिधी

मुंबई : राहुल गांधींनी आपल्या भारत जोडो यात्रेचा फोकस पूर्ण शिफ्ट केल्याचे कालपासून दिसून येत आहे. कारण महाराष्ट्रात राहुल गांधींनी अकोल्याच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या माफीनाम्याचा उल्लेख केल्यानंतर त्यांच्या विरोधात प्रचंड संताप उसळला आहे. तरी देखील काँग्रेसने त्यांचे समर्थन केले आहे. इतकेच नाही तर, आज त्यांच्याबरोबर भारत जोडो यात्रेत सामील झालेले महात्मा गांधींचे पण तुषार गांधी यांनी देखील राहुल गांधींच्या सावरकर विषयक वक्तव्याचे समर्थन केले आहे. Gandhi + Nehru Apologies Go Viral As Tushar Gandhi Supports Rahul Gandhi

तुषार गांधींनी राहुल गांधींचे समर्थन करताच सोशल मीडियावर त्यांच्या विरोधात देखील आवाज उठला असून महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ब्रिटिशांबरोबर केलेल्या तडजोडी आणि त्यांचे माफीनामे अनेकांनी सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.

इतकेच नाही तर पंडित नेहरू यांचे शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन आणि त्यांची पत्नी एडविना माउंटबॅटन यांच्याबरोबरचे काही फोटो देखील व्हायरल झाले आहेत. या फोटोंमधून पंडित नेहरू हे माउंटबॅटन यांची इलेक्ट्रिक शेव्हरने दाढी करताना दिसत आहेत, तर दुसऱ्या फोटोत व्हाईसरॉय पॅलेस मधील म्हणजे सध्याच्या राष्ट्रपती भवनातील एका पार्टीत ते एडमिना माउंटबॅटन यांच्या पायाशी बसलेले दिसत आहेत. एडविना यांच्या शेजारी पंडित नेहरूंच्या बहीण भगिनी विजयालक्ष्मी पंडित याही दिसत आहेत.

राहुल गांधीं विरुद्ध महाराष्ट्रभर संताप

राहुल गांधींनी सावरकरांविरुद्ध अपमानास्पद उद्गार काढल्यानंतर त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्रभर संताप उसळला असून मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, अमरावती, नाशिक, संभाजीनगर सावरकरांचे जन्मगाव भगूर आदी शहरांमध्ये भाजप आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलने केली आहेत. अनेक ठिकाणी राहुल गांधींच्या पोस्टरला जोडेमारा आंदोलन देखील कार्यकर्त्यांनी केले आहे. परंतु सोशल मीडियावर मात्र प्रामुख्याने महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचे माफीनामे जोरदार व्हायरल झाले आहेत.

Gandhi + Nehru Apologies Go Viral As Tushar Gandhi Supports Rahul Gandhi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात