माजी खासदाराचे राहुल गांधींविषयी अभद्र वक्तव्य, म्हणाले- राहुल गांधी अविवाहित, म्हणूनच गर्ल्स कॉलेजला जातात

Former MP's indecent statement about Rahul Gandhi, says Rahul Gandhi is unmarried, thats why he goes to girls college

देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुका सुरू आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान विविध नेत्यांची वक्तव्ये वादाचे कारण ठरत आहेत. केरळचे माजी खासदार जॉयस जॉर्ज यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधींवर (Rahul Gandhi) अभद्र टीका केली आहे. ते म्हणाले की, राहुल गांधी मुलींच्या महाविद्यालयात जातात, कारण ते अविवाहित आहेत. कॉंग्रेसने जॉयस यांच्या या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याची तयारी केली आहे. Former MP’s indecent statement about Rahul Gandhi, says Rahul Gandhi is unmarried, thats why he goes to girls college


विशेष प्रतिनिधी

तिरुवनंपुरम : देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुका सुरू आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान विविध नेत्यांची वक्तव्ये वादाचे कारण ठरत आहेत. केरळचे माजी खासदार जॉयस जॉर्ज यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधींवर अभद्र टीका केली आहे. ते म्हणाले की, राहुल गांधी मुलींच्या महाविद्यालयात जातात, कारण ते अविवाहित आहेत. कॉंग्रेसने जॉयस यांच्या या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याची तयारी केली आहे.

काय आहे प्रकरण…

2014 मध्ये इडुक्कीमधून माकपच्या समर्थनावर स्वतंत्र उमेदवार म्हणून लोकसभा निवडणुका जिंकणार्‍या जॉर्ज यांनी सोमवारी (29 मार्च) इरतायर येथील निवडणूक सभेत भाषण केले. त्यादरम्यान, त्यांनी कोची येथील महिला महाविद्यालयाला राहुल गांधींच्या भेटीचा संदर्भ देत त्यांच्याविषयी अभद्र टीका केली. तथापि, केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन म्हणाले की, डावी लोकशाही आघाडी (एलडीएफ) राहुल गांधींवर झालेल्या वैयक्तिक टीकेशी सहमत नाही. आम्ही राहुल गांधींचा राजकीय विरोध करतो, पण वैयक्तिक नाही.

काय म्हणाले माजी खा. जॉयस जॉर्ज…

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जॉयस जॉर्ज यांनी कॉंग्रेसप्रणीत युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (यूडीएफ) आणि विशेषत: राहुल गांधी यांच्यावर हल्ला केला. ते म्हणाले की, राहुल गांधींचा निवडणूक प्रचार म्हणजे ते फक्त मुलींच्या महाविद्यालयात जातील. तेथे जाऊन ते मुलींना बेंड व्हायला शिकवतील. मी मुलांना सांगेन की असे करू नका, त्यांच्या समोर सरळ उभे राहा. माजी कॉंग्रेस अध्यक्षाला भेटताना मुलींनी ‘सावध’ असले पाहिजे. राहुल गांधी विवाहित नाहीत, म्हणून अशा कार्यक्रमांना जातात. दरम्यान, कोची येथील सेंट टेरेसा कॉलेजमधील एका विद्यार्थिनीच्या विनंतीवरून राहुल गांधींनी अकिडो हा मार्शल आर्टचा प्रकार शिकवला होता.

निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार काँग्रेस

जॉयस जॉर्जच्या या वक्तव्याचा कॉंग्रेसने तीव्र निषेध केला आहे. केरळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथाला यांनी मंगळवारी (30 मार्च) राहुल गांधींविरुद्ध केलेल्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, हे दुर्दैवी आणि अस्वीकारार्ह आहे. माजी खासदारांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक व्हायला हवी, असेही ते म्हणाले. त्याचवेळी खासदार आणि युवा कॉंग्रेसचे नेते डी. कुरियाकोसे यांनी माजी खासदार जॉर्ज यांचा निषेध करताना म्हटले की, बहुधा त्यांनी स्वत:च्या चारित्र्याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, आता त्यांचा मूर्खपणा समोर आला आहे. राहुल गांधींवर टीका करण्याची त्यांची योग्यता आहे काय? ते माजी ऊर्जामंत्री एम.एम. मणि यांच्या पावलावर पाऊल टाकत आहेत, जे अशा अपमानास्पद वक्तव्यांसाठी करण्यासाठी ओळखले जातात. कुरियाकोसे म्हणाले की, माजी खासदाराने राहुल गांधींचा केवळ अपमानच केला नाही, तर मुली- विद्यार्थिनींचाही अपमानही केला आहे. यावर आता काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याची भूमिका घेतली आहे.

6 एप्रिल रोजी मतदान

केरळमधील सर्व विधानसभा जागांवर 6 एप्रिल रोजी मतदान होईल, तर निकाल 2 मे रोजी लागणार आहे. मतदानाआधी मोहीम जोरात सुरू आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी हे केरळमधील वायनाडचे खासदार आहेत. यामुळे राहुल गांधींचे केरळकडेही विशेष लक्ष आहे.

Former MP’s indecent statement about Rahul Gandhi, says Rahul Gandhi is unmarried, that’s why he goes to girls college

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी