बिहारचे माजी पोलीस महासंचालक अध्यात्माच्या वाटेवर, राजकारणाची वाट सोडून कथावाचकाच्या भूमिकेत


बिहार पोलिसांच्या प्रमुख पदाचा राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश केलेल्या गुप्तेश्वर पांडे यांनी आता अध्यात्माची वाट धरली आहे. आता पांडे कथावाचकाच्या भूमिकेत आले असून निरुपण करू लागले आहेत.Former Director General of Police of Bihar on the path of spirituality, leaving the path of politics in the role of Guru


विशेष प्रतिनिधी

पाटणा : बिहार पोलिसांच्या प्रमुख पदाचा राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश केलेल्या गुप्तेश्वर पांडे यांनी आता अध्यात्माची वाट धरली आहे. आता पांडे कथावाचकाच्या भूमिकेत आले असून निरुपण करू लागले आहेत.

सुशांत राजपूत आत्महत्या प्रकरणात गुप्तेश्वर पांडे आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आले होते. आता त्यांनी स्वत: फेसबुक पोस्ट लिहून आपल्या नवीन अवताराची माहिती दिली आहे. गुप्तेश्वर पांडे हे १९८७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. बिहारचे पोलीस महासंचालक म्हणून त्यांचा कार्यकाळ २८ फ्रेबुवारी २०२१ पर्यंत होता.



मात्र, त्यांनी यापूर्वीच राजीनामा दिला होता. यापूर्वीही २००९ मध्ये गुप्तेश्वर पांडे यांनी नोकरी सोडली होती. त्यानंतर भारतीय जनता पक्षातर्फे निवडणूक लढवली होती. हरल्यानंतर ते पुन्हा नोकरीत आले. नितीश कुमार सरकारने त्यांना पुन्हा नोकरीत घेऊन बिहारचे पोलीस महासंचालक बनवले होते.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून वादास सुरुवात झाल्यापासून बिहार पोलिसांचे तत्कालीन डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांचे नाव चर्चेत आले होते. बिहारने आत्महत्येचा गुन्हा नोंदवून सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्याबद्दल बोलताना, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबद्दल बोलण्याची रियाची ‘लायकी’ नसल्याची टिप्पणी चांगलीच गाजली होती.

त्यानंतर बिहार विधानसभेची निवडणूक जवळ येताच गुप्तेश्वर पांडे यांनी पोलीस खात्यातील नोकरीचा राजीनामा देत थेट राजकारणात उडी घेतली होती. पांडे यांनी जेडीयूमध्ये प्रवेश केल्यानंतर बक्सर जिल्ह्यातील कुठल्याही विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र जेडीयूने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या ११५ उमेदवारांच्या यादीत गुप्तेश्वर पांडे यांचे नावच नव्हते. तेव्हापासून जणू ते अज्ञातवासात होते.

आता त्यांनी फेसबुकपोस्ट लिहून त्यामध्ये आपला राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय चुकला असल्याचे म्हटले आहे. ते म्हणतात, आजपर्यंत असा डीजीपी पाहिला नाही ज्यानं आमदारकीसाठी राजीनामा दिला. माझ्यात यशस्वी राजकीय नेता बनण्याची क्षमता नाही. तसे असते तर कधीच नेता बनलो असतो. मला आमदार व्हायचं होतं कारण गरीब लोकांची सेवा करायचं होतं.

आता मी केवळ देवाची पूजा करणार आहे. माणूस हा सुखांच्या मागे लागतो परंतु खरं सुख देवात आहेत. मला देवाची सेवा करण्याची इच्छा आहे. एक वेळ अशी येते जेव्हा तुम्ही आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलता. मी अपवाद नाही. माझ्यातील हे परिवर्तन अचानक झाले नाही.

Former Director General of Police of Bihar on the path of spirituality, leaving the path of politics in the role of Guru

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात