Former cricketer, BJP candidate Ashok Dinda attacked by unknown persons in Bengal

प. बंगालमध्ये माजी क्रिकेटपटू, भाजप उमेदवार अशोक दिंडांवर अज्ञातांचा हल्ला, प्रचारादरम्यान कारवर दगडफेक

BJP candidate Ashok Dinda attacked : पश्चिम बंगालमध्ये दुसर्‍या टप्प्यातील मतदानाचा निवडणूक प्रचार मंगळवारी संपुष्टात आला होता, परंतु यादरम्यान क्रिकेटपटू-राजकारणी अशोक दिंडा यांनी त्यांच्या गाडीवर हल्ला झाल्याचा आरोप केला. अशोक दिंडा प्रचार करत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. माजी क्रिकेटपटू अशोक दिंडा भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. अज्ञात लोकांनी मोयना येथे दिंडा यांच्यावर हल्ला केला. Former cricketer, BJP candidate Ashok Dinda attacked by unknown persons in Bengal


विशेष प्रतिनिधी

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये दुसर्‍या टप्प्यातील मतदानाचा निवडणूक प्रचार मंगळवारी संपुष्टात आला होता, परंतु यादरम्यान क्रिकेटपटू-राजकारणी अशोक दिंडा यांनी त्यांच्या गाडीवर हल्ला झाल्याचा आरोप केला. अशोक दिंडा प्रचार करत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. माजी क्रिकेटपटू अशोक दिंडा भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. अज्ञात लोकांनी मोयना येथे दिंडा यांच्यावर हल्ला केला.

पश्चिम बंगालच्या मोयना येथे प्रचारादरम्यान अशोक दिंडा यांच्या कारची तोडफोड करण्यात आली आहे. या हल्ल्यात अशोक दिंडा यांना किरकोळ दुखापत झाली. या हल्ल्याबाबत अशोक दिंडा यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ आणि फोटोही पोस्ट केला आहे.

यापूर्वी अधिकारी बंधूंच्या कारवर हल्ला

बंगालमधील निवडणूक प्रचारादरम्यान हिंसाचाराची ही पहिली घटना नाही. यापूर्वी निवडणुकीच्या दिवशीही हिंसाचार आणि मारहाण झाल्याच्या काही घटना घडल्या. मतदानाच्या वेळी पूर्वी मेदिनीपूर जिल्ह्यातील कांठी विधानसभेत भाजप नेते आणि शुभेंदू अधिकारी यांचे बंधू सौमेंदू अधिकारी यांच्या कारवर हल्ला झाला.

त्या वेळी भाजप नेते सौमेंदू अधिकारी वाहनात नव्हते, म्हणून त्यांना दुखापत झाली नाही. या हल्ल्यासाठी सौमेंदू अधिकारी यांनी तृणमूल कॉंग्रेसवर आरोप केले आहेत. 18 मार्च रोजी निवडणूक प्रचारादरम्यान हाय प्रोफाइल सीट नंदीग्राम येथे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या निवडणूक सभेत हल्ला झाला. हा हल्ला तृणमूल कॉंग्रेस (टीएमसी) च्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप करण्यात आला होता. या हल्ल्यात एक भाजप कार्यकर्ता गंभीर जखमी झाला आहे.

मागच्या काही काळापासून पश्चिम बंगालमध्ये भाजप नेते व कार्यकर्त्यांवर अनेक वेळा प्राणघातक हल्ले झाले आहेत. प्रत्येक वेळी संशयाची सुई तृणमूल कार्यकर्त्यांवर गेली आहे. निवडणुकीच्या काळात नेत्यांवरील असे हल्ले पश्चिम बंगालमधील अराजक दर्शवत असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.

Former cricketer, BJP candidate Ashok Dinda attacked by unknown persons in Bengal

महत्त्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*