२५ लाखांचे इनाम नावावर असलेल्या नक्षलवाद्यांसह पाच जणांचा खात्मा


२५ लाख रुपयांचे इनाम नावावर असलेल्या जहाल नक्षलवाद्यासह पाच जणांचा पोलीसांनी खात्मा केला. खोब्रामेंढा जंगलात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या नक्षलवाद विरोधी अभियानात झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाले. Five killed, including Naxals, in the name of a reward of Rs 25 lakh


विशेष प्रतिनिधी

गडचिरोली : २५ लाख रुपयांचे इनाम नावावर असलेल्या जहाल नक्षलवाद्यासह पाच जणांचा पोलीसांनी खात्मा केला. खोब्रामेंढा जंगलात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या नक्षलवाद विरोधी अभियानात झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाले.

नक्षलवाद्यांचा उत्तर गडचिरोली विभागीय समितीचा सचिव २५ लाखांचे बक्षीस असलेला जहाल नक्षली ऋषी रावजी उर्फ पवन उर्फ भास्कर हीचामी (४६), राजू उर्फ सुखदेव बुधेसिंग नेताम (३२), अमर मुया कुंजाम (३०), सुजाता उर्फ कमला उर्फ पूनिता गावडे (३८) व अस्मिता उर्फ सखलु पदा (२८) असे तीन पुरुष व दोन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. अशी माहिती गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पत्रकारपरिषदेत दिली.सलग तीन दिवसांपासून या भागात सी 60 पथक अभियान राबवित आहे. शुक्रवार २७ मार्च पासून पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमकी सुरू आहेत. आतापर्यत तीन चकमकी झाल्या आहेत. शनिवारी सुमारे एक ते दीड तास चाललेल्या या चकमकीत पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी घनदाट जंगलात पसार झाले. या चकमकीनंतर घटनास्थळावरून एके 47 सह चार बंदुका व मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांचे साहित्य जप्त करण्यात आले.

खोब्रामेंढा जंगलात नक्षलवादी मोठ्या प्रमाणात एकत्र आले असून, ते दरवर्षी नक्षलवाद्यांकडून पाळल्या जात असलेल्या टीसीओसी नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर घातपात करण्याची शक्यता असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना मिळाली होती. यावर अपर पोलीस अधीक्षक (अभियान) मनीष कलवानीया, अप्पर पोलिस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांच्या नेतृत्वाखाली खोब्रामेंढा, हेटाळकसा जंगल परिसरात गडचिरोली पोलीस दलातील सी-६० चे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना शनिवार २८ रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास जंगलात तीन वेगवेगळ्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या ६० ते ७० नक्षलवाद्यांनी सी-६० जवानांना जीवे मारण्याच्या उद्देशाने जवानांच्या दिशेने गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल जवानांनी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. यावेळी सुमारे तासभर चाललेल्या चकमकीनंतर पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळून गेले.

या सर्व नक्षलवाद्यांवर ४३ लाखांचे बक्षीस होते. जहाल नक्षलवादी नर्मदाच्या अटकेनंतर उत्तर गडचिरोली विभागाची जबाबदारी भास्करकडे सोपविली होती. आता या चकमकीत तोच ठार झाल्याने चळवळीला जबर धक्का बसला आहे.

Five killed, including Naxals, in the name of a reward of Rs 25 lakh

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी