साहित्य क्षेत्रातील मानाच्या कमलादेवी चट्टोपाध्याय अवॉर्डसाठी फायनल सहा पुस्तकांची करण्यात आली निवड


विशेष प्रतिनिधी

दिल्ली : साहित्य क्षेत्रातील मानाच्या पारितोषिकांपैकी एक म्हणजे कमलादेवी चट्टोपाध्याय अवॉर्ड होय. न्यू इंडिया फाउंडेशनतर्फे दिला जाणाऱ्या 2021च्या ह्या अवॉर्डसाठी 12 पुस्तकांमधून 6 पुस्तकांची निवड करण्यात आली आहे. 15 लाख रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. भारतातील साहित्य क्षेत्रातील पुरस्कारांपैकी हा एक अतिशय महत्त्वाचा मानला जाणारा अवॉर्ड आहे. आधुनिक आणि समकालीन भारतावर संशोधन करुन लिहिण्यात आलेल्या पुस्तकांची निवड या अवॉर्डसाठी करण्यात आली आहे.

Final six books were selected for the prestigious Kamaladevi Chattopadhyay Award in the field of literature

निवडण्यात आलेली सहा पुस्तके खालीलप्रमाणे

1. The death script : dreams and delusions in naxal country
लेखक – आशुतोष भारद्वाज (फोर्ट ईस्ट हार्पर कोलिन्स पब्लिकेशन)

2. India’s first dictatorship : the emergency, 1975-77
लेखक – christophe jeffrelot and pratinav anil (हार्पर कोलिन्स पब्लिकेशन)

3. Naoroji : pioneer of indian nationalism लेखक दिनयार पटेल (हार्वर्ड युनिव्हर्सिटी प्रेस)

4. Gandhi in the gallery : the art of disobedience
लेखक – सुमती रामस्वामी (रोली बुक्स पब्लिकेशन)

5. The coolie’s great war : indian labour in a global conflict 1914-1921
लेखक – राधिका सिंघा (हार्पर कॉलिन्स पब्लिकेशन)

6. Jugalbandi the bjp before modi
लेखक- विनय सीतापती (पेंग्विन रॅण्डम हाऊस पब्लिकेशन)


अब्दुलरजाक गुरनाह या नोबेल विजेत्या साहित्यिकाबद्दल थोडंस


विजेता निवडण्यासाठी नेमण्यात आलेल्या ज्युरी कमिटीमध्ये राजकीय शास्त्रज्ञ आणि लेखिका नीरजा गोपाल जयमल, उद्योजक आणि लेखक नंदन नीलेकणी, इतिहासकार व लेखक श्रीनाथ राघवन, इतिहासकार लेखक नयन ज्योत लाहिरी, उद्योजक मनीष सभरवाल यांचा समावेश आहे. 1 डिसेंबर 2021 रोजी विजेता घोषित करण्यात येणार आहे.

Final six books were selected for the prestigious Kamaladevi Chattopadhyay Award in the field of literature

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात