HAL : मेक इन इंडियाचा विस्तार; हिंदुस्थान एरोनॉटिक्स तब्बल 1000 हेलिकॉप्टर्स बनविणार; 4 लाख कोटींच्या व्यवसायाची संभावना


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारताची हवाई दल क्षेत्रातील उत्पादन कंपनी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड मेक इन इंडिया संकल्पनेचा विस्तार करत भारतात तब्बल 1000 हेलिकॉप्टर्सची निर्मिती आणि उत्पादन करणार आहे. यातून येत्या 20 वर्षांमध्ये तब्बल 4 लाख कोटी रुपयांच्या व्यवसायाची संभावना आहे. Expansion of Make in India; Hindustan Aeronautics will make as many as 1000 helicopters

पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटक मधील तुमकुर मध्ये येत्या शहा फेब्रुवारीला हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडची ग्रीन फिल्ड हेलिकॉप्टर फॅक्टरी देशाला प्रदान करतील. तब्बल 615 एकर मध्ये पसरलेली ही हेलिकॉप्टर फॅक्टरी विविध प्रकारच्या हेलिकॉप्टर्सची निर्मिती करेल. सुरुवातीला वर्षभरात 30 हेलिकॉप्टर्स निर्मिती, त्यानंतर क्षमता वाढवून दुप्पट म्हणजे 60 हेलिकॉप्टर्सची निर्मिती, तर त्यानंतर वर्षभरात 90 हेलिकॉप्टर्सच्या निर्मितीपर्यंत फॅक्टरीची क्षमता वाढ अपेक्षित आहे.

तुमकुरच्या फॅक्टरीत तयार झालेली हेलिकॉप्टर्स भारतीय लष्कराच्या उपयोगात तर आणली जातीलच, पण त्याचबरोबर या हेलिकॉप्टरची निर्यात देखील अन्य देशांना करण्यात येईल. आगामी 20 वर्षांमध्ये तुमकुर ग्रीनफिल्ड हेलिकॉप्टर फॅक्टरीत तब्बल 1000 हेलिकॉप्टर्सची निर्मिती करण्याची महत्त्वाकांक्षी योजना आहे. यातून देशाला तब्बल 4 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय मिळणार आहे.

ही हेलिकॉप्टर्स 3 ते 15 टन वजनाची असतील आणि भारतीय लष्कराच्या विविध उपयोगाची असतील. यामध्ये लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर्स आणि मल्टी रोल हेलिकॉप्टर्सचा समावेश असेल. या सर्व प्रकारच्या हेलिकॉप्टर्सचे डिझाईन ते उत्पादन सर्व भारतीय असेल. संरक्षण उत्पादन क्षेत्रातला मेक इन इंडिया संकल्पनेचाचा हा विस्तार आहे.

Expansion of Make in India; Hindustan Aeronautics will make as many as 1000 helicopters

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात