बाबरी मशिदीच्या जागी राममंदिरच होते याचे आता पुरावेच पुरावे, खोदकाम करताना सापडल्या खंडित देवमूर्ती

अयोध्येतील राममंदिराचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मोकळा होऊन कामही सुरू झाला आहे. मात्र, आता बांधकाम करताना राममंदिराचा विध्वंस करून बाबराने बाबरी मशीद बांधली याचे आता पुरावेच्या पुरावे सापडू लागले आहेत.


विशेष प्रतिनिधी

अयोध्या : अयोध्येतील राममंदिराचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मोकळा होऊन कामही सुरू झाला आहे. मात्र, आता बांधकाम करताना राममंदिराचा विध्वंस करून बाबराने बाबरी मशीद बांधली याचे आता पुरावेच्या पुरावे सापडू लागले आहेत. Evidence that there was a Ram temple on the site of the Babri Masjid, broken idols found during excavations

श्रीराम जन्मभूमी मंदिर निमार्णासाठी पायाचे खोदकाम करताना प्राचीन सीता मातेची रसोई, चरणपादुका, चौकट आणि खंडित देवमूर्तींचे अवशेष आढळून आले आहेत. न्मभूमी परिसराचे समतलीकरण सुरू आहे. त्यात अनेक स्तंभ, शिवलिंग इत्यादी प्राचीन अवशेष आधीच सापडले. त्यांना ट्रस्टने सुरक्षित ठेवले आहे.


राममंदिर क्षेत्रात ४० फूट खोल खोदकाम करण्यात आले. उत्तर-पूर्व दिशेतील मानस भवनाच्या परिसरात समतल करण्याचे काम सुरू आहे. ट्रस्टचे कार्यालय प्रभारी प्रकाश गुप्ता म्हणाले, समतलीकरणादरम्यान काही मंदिरे व इमारतींना पाडण्यात आले होते. सापडलेल्या गोष्टी याच मंदिरांतील अवशेष असू शकतात.

यापूर्वीही आॅगस्ट महिन्यात मंदिर परिसरात सपाटीकरण करताना पुरातन मंदिराचे काही अवशेष सापडले होते. ट्रस्टकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार, सपाटीकरणादरम्यान मोठ्या संख्येत पुरातन अवशेष, देवी-देवतांच्या तुटलेल्या मूर्ती, पुष्प कलश, खांब इत्यादी वस्तू सापडल्य होत्या.

या सर्व पुरातन वस्तू म्हणजे राम मंदिराची सत्यता असल्याचे मानले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाआधी रामलल्ला ज्या ठिकाणी विराजमान होते, तिथेच राम जन्मभूमीसाठीच्या सपाटीकरणाचं काम सुरू आहे.

Evidence that there was a Ram temple on the site of the Babri Masjid, broken idols found during excavations

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*