निवडणूक आयोग – कोर्टाकडे आज लक्ष; शिवसेनेचा धनुष्यबाण, ज्ञानवापीतील शिवलिंगाचे कार्बन डेटिंगवर निर्णय अपेक्षित!!


प्रतिनिधी

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने वाराणसी कोर्टाकडे आज सगळ्यांचे लक्ष आहे. कारण शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण नेमका कोणाचे ठाकरे गटाचे की शिंदे गटाचे?, याचा निर्णय निवडणूक आयोग आज घेण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर वाराणसीच्या कोर्टाच्या एका महत्त्वाच्या निकालाकडे देखील सर्वांचे लक्ष आहे ते म्हणजे ज्ञानवापी मशिदीतील शिवलिंगाचे कार्बन डेटिंग करण्याचा निर्णय वाराणसी कोर्ट आज देणे अपेक्षित आहे.Election Commission – Attention to court today; Shiv Sena’s bow, decision on carbon dating of Shivlinga in Gyanvapi expected!!

शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण ठाकरे गटाकडे येईल की शिंदे गटाकडे जाईल?, यावर निवडणूक आयोग त्याच्या पुढे आलेल्या विविध प्रतिज्ञापत्रांवर आधारित विचार करून आज निर्णय देणे अपेक्षित आहे. निवडणूक आयोगाकडे दोन्ही गटातली लाखो प्रमाण प्रतिज्ञापत्रे सादर झाली आहेत. मुंबईत विधानसभेची पोटनिवडणूक आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा ठाकरे गट तिथे आपला उमेदवार उभा करणार आहे. त्यामुळे त्या उमेदवाराला धनुष्यबाण हे मूळ चिन्ह मिळते की धनुष्यबाण चिन्ह गोठवले जाऊन काही दिवसांनी निवडणूक आयोग निर्णय देते, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे लागले आहे. शिंदे गटाने धनुष्यबाण जिल्हा संदर्भात तातडीने निर्णय घेण्याची याचे का पुन्हा एकदा सादर केली आहे.



परंतु निवडणूक आयोगाला कागदपत्रांचा अभ्यास करण्यासाठी अजून वेळ हवा असला तर धनुष्यबाण हे चिन्ह गोठविले जाऊ शकते आणि विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटाला वेगळ्या चिन्हाच्या ऑफर दिली जाऊ शकते आणि महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक चिन्हाचा निकाल निवडणूक आयोग नंतर देऊ शकते. अर्थात या सर्व शक्यता आहेत. आजच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

त्याचबरोबर वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीतील शिवलिंगाचे कार्बन डेटिंग करून निर्णय घ्यावा, अशी मागणी हिंदू पक्षाने कोर्टात केली आहे. परंतु मुस्लिम पक्षाने ज्ञानवापी मशिदीच्या वजूखान्यात आढळलेले शिवलिंग नसून ते कारंजे आहे. त्यामुळे त्याचे कार्बन डेटिंग करण्याची गरज नाही, असा दावा केला आहे. कोर्ट आज त्यावर निर्णय घेणे अपेक्षित आहे.

कोर्टाने शिवलिंगाच्या कार्बन डेटिंगचा निकाल दिल्यास हिंदू पक्षाचा तो विजय मानला जाईल आणि कार्बन डेटिंगची निष्कर्ष येईपर्यंत पुढच्या निकालाची वाट पाहावी लागेल. पण सकृत दर्शनी ते कारंजे असल्याचा मुस्लिम पक्षाचा दावा मात्र फेटाळला जाऊ शकेल.

Election Commission – Attention to court today; Shiv Sena’s bow, decision on carbon dating of Shivlinga in Gyanvapi expected!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात