नक्षलवाद्यांकडून धमकीची एकनाथ शिंदे यांची स्टंटबाजी, माओवादी पार्टीच्या प्रवक्त्यानेच केले स्पष्ट


विशेष प्रतिनिधी

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी माओवादी पार्टीकडून (नक्षलवादी) दिलेलीच नाही. ती तथाकथित धमकी म्हणजे स्टंटबाजी असून त्याचा आम्ही निषेध करतो, असे पत्रक भाकपाचा(माओवादी) पश्चिम ब्युरो प्रवक्ता श्रीनिवास याने काढले आहे.Eknath Shinde’s stunt of threat from Naxals was made clear by the spokesperson of Maoist party

जिल्ह्यातील लोहखाणींची लीज आणि खाणींविरोधातील आंदोलन या विषयावर श्रीनिवास याने काढलेल्या पत्रकात सत्तापक्षातील मंत्री विजय वडेट्टीवार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. खाणींविरोधातील आंदोलनात सहभागी होण्यावरून वडेट्टीवार यांना, तर लोहप्रकल्प उभारण्यावर ठाम असण्यावरून शिंदे यांच्यावर निशाणा साधताना श्रीनिवास याने म्हटले आहे की, तत्कालीन काँग्रेस सरकारच्या काळातच लोहखाणीची लीज देण्यात आली.



भाजप-शिवसेनेच्या सरकारने अन्य कंपन्यांना लीज वाटप केली. त्यामुळे वडेट्टीवार आणि त्यांचा काँग्रेस पक्ष सुरजागड खाण खोदण्याच्या बाजूने आहे हे स्पष्ट होते. सत्ता आणि कायदा यांच्या हातात असताना सुरजागड खाण बंद करण्याचा आदेश का देत नाही?

कायदा व सुव्यवस्थेचे कारण सांगून वडेट्टीवार यांनी आंदोलनाकडे पाठ फिरविली हा बहाणा होता, असा आरोप त्यांनी केला. हे पत्रक सोशल मीडियावर फिरत असले तरी ते नक्षल्यांकडून जारी झाले किंवा नाही याबाबतची सत्यता कळू शकली नाही.

नगरविकास मंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांनकडून जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र आल्याचे सांगितले जात होते. तुम्ही पालकमंत्री झाल्यापासून विकासाची कामे चालू केली आहेत. तुम्ही चालू केलेल्या विकास कामामुळे आम्हाला मिळणाºया पैशांचा ओघ थांबला आहे. त्यामुळे जिल्ह्यात चालू केलेली विकासकामे थांबवा, अन्यथा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना उडवून देऊ अशा धमकीचे पत्र एकनाथ शिंदे यांच्या घरी मिळाले असल्याचे म्हटले होते.

जेव्हापासून तुम्ही पालकमंत्री झाला आहात तेव्हापासून आमचे अनेक साथीदार शहीद झाले आहेत. आमचे साथीदार केवळ गडचिरोली जिल्ह्यातच नाहीत. सर्व शहरांमध्ये आमचे साथीदार आहेत. तुमच्या आसपासही आमचे साथीदार फिरतात हे तुम्हाला माहिती नसावे. तुमच्याकडून नक्षलवाद संपवण्याची वेळोवेळी भाषा होत आहे. नक्षलवाद संपवणे हे शक्य नाही. त्यामुळे नक्षलवाद संपवण्याची भाषा तुम्ही करू नये. आम्ही इतर सर्व राज्यात आहोत. तुम्हीच नाही तर आम्हाला कोणीच संपवू शकत नाही, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Eknath Shinde’s stunt of threat from Naxals was made clear by the spokesperson of Maoist party

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात