खर्च करण्याआधी दहादा विचार करा


कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतरचे जग हे पूर्णतः वेगळे असणार आहे. निर्बंध सैल झाल्यामुळे अर्थचक्र सुरळीत होत आहे. सारे दुकाने, मॉल्स सुरु होत आहेत. अशा वेळी हाताशी असलेले पैसे कसे व कोठे खर्च करायचे याचा प्रत्येकाने विचार केलाच पाहिजे. ज्याप्रमाणे पैसा मिळवणे महत्वाचे आहे तितकेच ते कसे खर्च करावे हे कळणेही महत्वाचेच आहे. याचा आदमास प्रत्येकाला कोरोना काळात आलाच असेल. त्याआधी म्हणजे कोरोनाच्या आधी पैसे कुठे आणि का खर्च करायचा हे न कळाल्याने अनेक जणांना आर्थिक ओढाताणीच्या परिस्थिती अनुभवावी लागली असेल. Think twice before spending

हाती असणारा पैसा गरज नसलेल्या कारणांवर खर्च केल्याने जेव्हा गरज पडते तेव्हा हाताशी पैसा राहात नाही. म्हणून माणूस अधिक पैशाच्या मागे जातो. जगात गाजलेल्या रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकाचे लेखक राबर्ट कियोसाकी यांच्या मते अधिक पैसा मिळाल्याने कुणाच्याही आर्थिक अडचणी क्वचितच दूर होतात. गरज असते ती स्वतःवर नियंत्रण ठेवण्याची. कपड्यांवर पैसे खर्च करून किती कराल. कपडे समाजात प्रतिष्ठा देतात हे नक्की. पण कठिण प्रसंगी साथ देतात का.. नाही. दागिने तुम्ही बनविले असतील, पण नेहमी वापराल तर कठिण प्रसंगाच्या वेळेस नक्कीच त्यात तुट येऊ शकते. तेव्हा एखादी गोष्ट खरेदी करताना सार्वकालिक विचार करा. योग्य वाटले तरच खरेदी करा. याबाबत एक जपानी गोष्ट सांगितली जाते. जपानी लोक तीन गोष्टींची नेहमी आठवण ठेवतात. पहिली तलवार, दुसरी दागिने आणि तिसरी आरसा यांची शक्ती. तलवार शस्त्र आहे. त्यामुळे स्वःसंरक्षणासाठी शस्त्रशक्ती शक्तीशाली ठरते. दागिणे पैशाची शक्ती दाखवितात. सौंदर्य तर वाढवितातच शिवाय पडत्या काळाला हमखास उपयोगी ठरू शकतात. या सर्वात महत्त्वाचा तो आरसा. आरसा स्वतःला स्वतःची ओळख दाखवितो. स्वतःबद्दलचे ज्ञान करून देतो.

स्वतःला ओळखणं हा जपानी कथेनुसार सर्वात मौल्यवान शक्ती आहे. त्यामुळे स्वतःला ओळखा. स्वतःची ओळख ही तुम्ही केलेल्या पेहराव तो किती रूपयांचा आहे, किंवा तुम्ही घातलेले दागिणे किती तोळ्याचे आहेत यावरून होत नसते. हे तुम्हालाही तितकेच माहिती आहे. जपानी कथेच्या सारानुसार स्वतःला ओळखा. धन संपत्ती तुमच्याकडे चालून येईल आणि टिकेलही.

Think twice before spending

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात