महाराष्ट्रातील निर्बंधांमुळे देशाच्या अर्थचक्राला 40 हजार कोटींचा फटका, जीडीपीवर संकट

महाराष्ट्रातील निर्बंधांमुळे देशाच्या अर्थचक्राला 40 हजार कोटींचा फटका, जीडीपीवर संकट । Restrictions in Maharashtra May hit the country's economy by Rs 40,000 crore Care Rating Agency Forecast

Care Rating Agency Forecast : महाराष्ट्रातील निर्बंधांमुळे मोठे आर्थिक नुकसान होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. केअर रेटिंग्जच्या मते, एकट्या महाराष्ट्रातील लॉकडाऊनमुळे देशाला 40 हजार कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान होईल. रेटिंग एजन्सीच्या मते, या एका महिन्याच्या लॉकडाउनचा सर्वात जास्त परिणाम ट्रेड, हॉटेल आणि ट्रान्सपोर्ट क्षेत्रावर होणार आहे. Restrictions in Maharashtra May hit the country’s economy by Rs 40,000 crore Care Rating Agency Forecast


विशेष प्रतिनिधी

मुंबई : देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. कारोनाच्या या भयंकर उद्रेकावर नियंत्रणासाठी महाराष्ट्र सरकारने नाइट कर्फ्यू आणि वीकेंड लॉकडाऊन अशा उपायोजना केल्या आहेत. यादरम्यान राज्य सरकारने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व बाबींवर बंदी घातली आहे.

वास्तविक, देशभरातील जेवढे कोरोनाचे एकूण रुग्ण आहेत, त्यातील निम्मे महाराष्ट्रातील आहेत. देशभरात 5 एप्रिल रोजी कोरोना रुग्णांच्या संख्येने 1 लाखांचा टप्पा ओलांडला होता. यापैकी एकट्या महाराष्ट्रातून 47 हजार रुग्ण होते. यापूर्वी 4 एप्रिल रोजी महाराष्ट्रातून 57,074 कोरोना रुग्ण आढळले होते. कोणत्याही राज्यातील ही सर्वाधिक आकडेवारी आहे. आता महाराष्ट्रातील निर्बंधांमुळे मोठे आर्थिक नुकसान होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. केअर रेटिंग्जच्या मते, एकट्या महाराष्ट्रातील लॉकडाऊनमुळे देशाला 40 हजार कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान होईल. रेटिंग एजन्सीच्या मते, या एका महिन्याच्या लॉकडाउनचा सर्वात जास्त परिणाम ट्रेड, हॉटेल आणि ट्रान्सपोर्ट क्षेत्रावर होणार आहे.

राज्य सरकारच्या नव्या नियमावलीनुसार रेटिंग एजन्सीने असा अंदाज बांधला आहे की, एका महिन्याच्या लॉकडाउनमुळे तब्बल 40,000 कोटी रुपयांचा जीव्हीए (ग्रॉस व्हॅल्यू अॅडेड) प्रभावित होईल. जर लॉकडाउन आणखी वाढवले, तर राज्यात उत्पादन आणखी कमी होईल.’ एजन्सीच्या मते, या आर्थिक नुकसानामुळे अर्थव्यवस्थेच्या सकल मूल्यवर्धन (जीव्हीए) वाढ 0.32 टक्के घटू शकते. GSGP अथवा ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्टच्या बाबतीत महाराष्ट्र देशातील सर्वात मोठे राज्य ठरते. ग्रॉस व्हॅल्यू अॅडेडमध्ये महाराष्ट्राचे योगदान जवळजवळ 15 टक्के आहे.

केअर रेटिंग्जच्या मते, ट्रेड, होटल आणि ट्रान्सपोर्ट क्षेताला तब्बल 15,772 कोटी रुपयांचे नुकसान होईल. तर फायनान्शियल सर्व्हिसेस, रिअल इस्टेट आणि प्रोफेशनल सर्व्हिसेसना 9,885 कोटी रुपयांचे नुकसान होईल. दुसरीकडे, पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशनला 8,192 कोटी रुपयांचे नुकसान होईल. याशिवाय कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रेटिंग एजन्सीने जीडीपी ग्रोथचा अंदाजही घटवला आहे. एका आठवड्यापूर्वी एजन्सीने 11 ते 11.2 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला होता. हा आता कमी करून 10.7 ते 10.9 टक्के केला आहे.

Restrictions in Maharashtra May hit the country’s economy by Rs 40,000 crore Care Rating Agency Forecast

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती