Debit Card-Credit Card Auto-Payment : रिझर्व्ह बँकेने स्वयंचलित पेमेंटसंदर्भात बदलले हे नियम, 1 एप्रिलपासून लागू

RBI changes rules regarding Debit card, credit card auto-payment, effective From April 1

Debit Card-Credit Card Auto-Payment : एक एप्रिलपासून विविध सेवांच्या बिलांचे ऑटो रिचार्ज आणि पेमेंट (ऑटोमॅटिक रेकरिंग पेमेंट) आता आपोआप होणार नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 31 मार्चनंतर पडताळणीसाठी अतिरिक्त उपाय (एएफए) बंधनकारक केले आहेत. तथापि, पेमेंट सुविधा देणाऱ्या बँका आणि प्लॅटफॉर्म ऑटो पेमेंटसंदर्भात आरबीआयच्या निर्देशांचे पालन करण्यासाठी अतिरिक्त वेळ मागत आहेत. RBI changes rules regarding Debit card, credit card auto-payment, effective From April 1


विशेष प्रतिनिधी

मुंबई : एक एप्रिलपासून विविध सेवांच्या बिलांचे ऑटो रिचार्ज आणि पेमेंट (ऑटोमॅटिक रेकरिंग पेमेंट) आता आपोआप होणार नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 31 मार्चनंतर पडताळणीसाठी अतिरिक्त उपाय (एएफए) बंधनकारक केले आहेत. तथापि, पेमेंट सुविधा देणाऱ्या बँका आणि प्लॅटफॉर्म ऑटो पेमेंटसंदर्भात आरबीआयच्या निर्देशांचे पालन करण्यासाठी अतिरिक्त वेळ मागत आहेत.

रिझर्व्ह बँकेचा निर्णय

चार डिसेंबर रोजी, आरबीआयने प्रादेशिक ग्रामीण बँका (आरआरबी), एनबीएफसी (नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या) आणि देयक सुविधा देणार्‍या सर्व बँकांना कार्ड किंवा प्रीपेड पेमेंट उत्पादने (पीपीआय) किंवा युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) देण्याचे निर्देश दिले. जर एएफए स्वयंचलित बिल पेमेंट (देशी किंवा विदेशी) प्रणालीचे अनुपालन करत नसेल, तर ही यंत्रणा 31 मार्च 2021 पासून सुरू राहणार नाही.

रिझर्व्ह बँकेचा या निर्णयामागे हेतू काय?

कार्डाद्वारे व्यवहार बळकट करणे आणि सुरक्षित करणे या उद्देशाने जोखीम कमी करण्याच्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून केंद्रीय बँकेने हा निर्णय जाहीर केला आहे. या अतिरिक्त पडताळणीच्या उपायांचे पालन न केल्यास, संबंधित युनिट्सला विजेसह अन्य ग्राहक-केंद्रित सेवांवर 31 मार्चनंतर ओटीटीसह (ओव्हर द टॉप) इतर बिलांच्या देयकावर परिणाम होऊ शकतो.

नुकतेच, रिझर्व्ह बँकेने कॉन्टॅक्टलेस कार्डद्वारे पेमेंट करण्याची मर्यादा आणि कार्ड व यूपीआयमार्फत स्वयंचलित बिल देयकांची मर्यादा 1 जानेवारीपासून 2 हजारऐवजी 5 हजार रुपयांपर्यंत वाढविली. याचा उद्देश डिजिटल व्यवहार सुलभ करणे आणि सुरक्षित करणे, हा होता.

बँकांना काय करावे लागेल?

या नवीन नियमांतर्गत बँकांना नियमितपणे बिले भरण्याबाबतची माहिती ग्राहकाला द्यावी लागेल आणि ग्राहकांकडून मान्यता मिळाल्यानंतरच ती भरता येईल. त्यामुळे बिलांचे पेमेंट आपोआप होणार नाही, तर ग्राहकाकडून पडताळणीनंतरच होईल.

नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार 5000 हून अधिक रुपयांच्या पेमेंटसाठी बँकांना नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्राहकांना ‘वन-टाइम पासवर्ड’ पाठवावा लागेल. ई-कॉमर्स कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, बँकांची आरबीआयच्या निर्देशांची अंमलबजावणी करण्याची अद्याप तयारी झालेली नाही.

ते म्हणाले की, जर आरबीआयने नियमांचे पालन करण्यास वेळ दिला नाही तर 1 एप्रिलपासून बँका व्यवहारासंदर्भात ग्राहकांनी दिलेल्या ई-मंजुरीचे पालन करू शकणार नाहीत. यामुळे बिलांच्या ऑटो पेमेंटसंबंधी आणि इतर व्यवहारांत अडथळा येईल. सेवा विस्कळीत झाली तर परिणामी डिजिटल पेमेंटसंदर्भात ग्राहकांच्या विश्वासाला तडा जाईल.

RBI changes rules regarding Debit card, credit card auto-payment, effective From April 1

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती