भारताला मंदीच्या खाईतून बाहेर काढणारे रिझर्व्ह बॅँकेचे माजी गव्हर्नरही म्हणतात खासगीकरण आवश्यकच

जागतिक मंदीच्या काळात २००८ मध्ये भारताला मंदीच्या खाईतून बाहेर आणणारे रिझर्व्ह बॅँकेचे माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी भारताच्या शाश्वत विकासासाठी खाजगीकरण आवश्यक असल्याचे म्हटले आहे. Former RBI governor says privatization is necessary to pull India out of recession


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : जागतिक मंदीच्या काळात २००८ मध्ये भारताला मंदीच्या खाईतून बाहेर आणणारे रिझर्व्ह बॅँकेचे माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी भारताच्या शाश्वत विकासासाठी खाजगीकरण आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाचे माजी गव्हर्नर आणि माजी वित्तीय सचिव डी. सुब्बाराव यांनी खाजगीकरणाचे समर्थन केले आहे. ते म्हणाले, आताच्या घडीची परिस्थिती पाहता खाजगीकरण भारताला विकासाच्या मार्गावर परत नेण्यासाठी उपयुक्त आहे. सरकारने आता खाजगी उद्योगांसाठी जागा मोकळी करून देणे गरजेचे आहे.सरकारी कंपन्या विकणे तोट्याचे नाही, तर त्यामुळे सरकारकडून पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक होत असते. जे अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी अत्यावश्यक आहे. या आधीच्या सरकारने सरकारी कंपन्यांमध्येच मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून ठेवली आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सार्वजनिक क्षेत्रात गुंतवणुकीचे आवाहन केले आणि सार्वजनिक क्षेत्रच गुंतवणुकीचे केंद्र बनले.

खाजगी क्षेत्रात फारशी गुंतवणूक नव्हती, उद्योजक पुढे येत नव्हते, खाजगी भांडवल नव्हते. त्यामुळे सरकारला अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठी व्यवस्थेत राहणे आवश्यक होते. भारताने कोरोना संकटातून सावरण्यात यश मिळवले आहे. परंतु, आऊटपूट गमावणे आणि वाढती असमानता या मुख्य चिंता आहेत. ९ टक्के वाढीवर परतण्यासाठी अजून काही वेळ लागणार आहे. सरकारने आता निर्यातीवर भर देणे अत्यावश्यक आहे.

खाजगी क्षेत्र मोठ्या प्रमाणात विकसित झाले आहे. वित्तीय क्षेत्र विकसित झाले. सरकारने आता खाजगी उद्योगांसाठी जागा मोकळी करून देणे गरजेचे आहे. सरकारी कंपन्या विकणे तोट्याचे नाही, तर त्यामुळे सरकारकडून पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक होत असते. यामुळे शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात गुंतवणूक होत आहे, जे अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी अत्यावश्यक आहे, असे सुब्बराव यांनी सांगितले.

डी. सुब्बाराव हे २००८ मध्ये रिझर्व्ह बॅँकेचे गव्हर्नर होते. यावेळी अमेरिकेतील सबप्राईम घोटाळ्यामुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था संकटात सापडली होती. मंदीचे संकट आले होते. परंतु, सुब्बाराव यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे मंदीचा फटका भारताला बसला नाही. याजदरात कपात करण्यापासून अनेक निर्णय त्यांनी घेतले.

Former RBI governor says privatization is necessary to pull India out of recession

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*