थेट परकीय गुंतवणूक सार्वकालिक उच्च स्तरावर, परकीय गंगाजळीत 100 अब्ज डॉलरहून अधिक वाढ

Foreign Direct Investment hits all time high in 2021; forex reserves jump over 100 billion

Foreign Direct Investment : मार्च 2021 मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात देशात थेट परकीय गुंतवणूक 43.366 बिलियन डॉलरच्या नव्या पातळीवर पोहोचली. ही गतवर्षीच्या 43.013 बिलियन डॉलरपेक्षा जास्त आहे. कोरोना महामारीच्या वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समूहातील कंपन्यांद्वारे हिस्सेदारी विक्रीमुळे एफडीआयमध्ये मोठी वाढ नोंदवण्यात आली. या कंपनीने वर्षभरात तब्बल 35 बिलियन डॉलर जमवले. Foreign Direct Investment hits all time high in 2021; forex reserves jump over 100 billion


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मार्च 2021 मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात देशात थेट परकीय गुंतवणूक 43.366 बिलियन डॉलरच्या नव्या पातळीवर पोहोचली. ही गतवर्षीच्या 43.013 बिलियन डॉलरपेक्षा जास्त आहे. कोरोना महामारीच्या वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समूहातील कंपन्यांद्वारे हिस्सेदारी विक्रीमुळे एफडीआयमध्ये मोठी वाढ नोंदवण्यात आली. या कंपनीने वर्षभरात तब्बल 35 बिलियन डॉलर जमवले.

भारतीय रिझर्व्ह बँकेनुसार, आर्थिक वर्ष 2020-21मध्ये थेट परकीय गुंतवणूक 54.665 बिलियन डॉलर होती. भारताचा एफडीआय 11.299 डॉलर होता. परिणामी, 43.336 डॉलरचा शुद्ध एफडीआय झाला. भारतातील एफडीआयमध्ये रिलायन्स समूहाच्या कंपन्यांद्वारे फेसबुक, गुगल आणि इतर अनेक जागतिक गुतवणूकदारांना भागीदारी विक्रीमुळे वाढ झाली आहे. रिलायन्स समूहाने जिओ प्लॅटफॉर्म्स आणि रिलायन्स रिटेलमध्ये भागीदारी विकली आणि वर्षादरम्यान 35 बिलियन डॉलरहून जास्त गोळा केले. यामुळे वर्षाच्या कालावधीत भारतातील एकूण एफडीआयमध्ये 64 टक्क्यांहून जास्त वाढ झाली.

परकीय गंगाजळीतही उसळी

एफडीआयशिवाय परकीय गंगाजळीतही वाढ दिसून आली. मार्च 2021 च्या अखेरीस FPIचे ऋण आणि इक्विटीमध्ये प्रवाह 36.18 बिलियन डॉलर होता. आर्थिक वर्ष 2014-15 मध्ये प्राप्त 45.6 बिलियन डॉलरच्या शुद्ध एफपीआय प्रवाहानंतर हे दुसऱ्या स्थानी होते. तथापि, इक्विटीमध्ये एफपीआयचा प्रवाह वर्षादरम्यान $37 बिलियनच्या नव्या स्तरावर पोहोचला. एफडीआय आणि परकीय गंगाजळीत गुंतवणूक (एफपीआई) चे पैशांच्या मजबूत प्रवाहामुळे विदेशी मुद्रा भंडारमध्येही उसळी आली. मार्च 2021 ला समाप्त झालेल्या आर्थिक वर्षात परदेशी मुद्रा भंडारात 100 बिलियन डॉलरहून अधिक वाढ झाली आणि 2 एप्रिल 2021 रोजी समाप्त झालेल्या सप्ताहात 576.8 बिलियन डॉलर झाली.

महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि दिल्ली या चार राज्यांचा एफडीआयमध्ये जवळजवळ 90 टक्के वाटा आहे. यात महाराष्ट्राने तब्बल 46.67 टक्क्यांहून अधिक गुंतवणूक आकर्षित केली, यानंतर गुजरातने 24.38 टक्के मिळवली. भारतीय अर्थव्यवस्थेतील विकास आणि जागतिक केंद्रीय बँकांनी आणलेल्या लिक्विडीटमुळे परकीय गुंतवणुकीचा प्रवाह आला आहे. आयटी, फार्मा, टेलिकॉम आणि डिजिटल इकॉनॉमी क्षेत्रांनी यातील बहुतांश प्रवाह आकर्षित केला आहे.

उद्योगक्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, कोविड महामारीचा प्रकोप असूनही हा प्रवास अबाधित राहील, कारण एफडीआय गुंतवणूकदार हे साधारपणे अनेक वर्षांचा दृष्टिकोन ठेवून गुंतवणूक करतात. अनेक उभरत्या क्षेत्रांसाठी सरकारद्वारे सादर करण्यात आलेल्या उत्पादनाशी संबंधित प्रोत्साहन योजना, डिजिटल अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रातील संभाव्य वाढ, सोबतच केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या योजनांमुळे परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित केले आहे.

एफडीआयशिवाय एफपीआय प्रवाहातही अर्थव्यवस्थेत वेगाने वाढला आहे. भारतीय कंपन्यांनी एप्रिलमध्ये परदेशात एकूण 2.51 अब्ज डॉलरच्या प्रत्यक्ष भांडवली गुंतवणुकीची (ओएफडीआय) प्रतिबद्धता दर्शवली. यात 1.75 अब्ज डॉलर कर्जाच्या रूपात, 42.14 कोटी डॉलर शेअर भांडवल आणि 33.31 कोटी डॉलर गॅरंटीच्या रूपात गुंतवण्यात आले. आरबीआयच्या एप्रिल 2021 च्या ओएफडीआय आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. मार्च 2021 मध्ये भारताच्या ओएफडीआयमध्ये 1.99 अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली.

कोणत्या कंपनीने किती केली गुंतणूक?

एप्रिलमध्ये टाटा स्टीलने सिंगापूरमध्ये आपली पूर्ण स्वामित्व असलेल्या कंपनीत एक अब्ज डॉलरची गुंतवणूक केली. दुसरीकडे, इंटरग्लोब एंटरप्रायजेस प्रा. लि. ने ब्रिटन स्थित संयुक्त उद्योगात 14.56 कोटी डॉलरची गुंतवणूक केली. रिलायन्स इंडस्ट्रियल इन्वेस्टमेंट्स अँड होल्डिंग्ज लिमिटेडने ब्रिटनमध्ये पूर्ण स्वामित्वाच्या कंपनीत 7.85 कोटी डॉलर गुंतवणुकीची घोषणा केली.

रिलायन्स इंडस्ट्रीजने रिलायन्स ब्राँडसोबत मिळून ब्रिटन, सिंगापूर, यूएई आणि अमेरिकेत पूर्ण स्वामित्व आणि संयुक्त उद्यमांमध्ये 9.15 कोटी डॉलरची गुंतवणूक केली. याशिवाय व्हेरॉक इंजिनिअरिंगने नेदरलँड स्थित कंपनीत 6.55 कोटी डॉलरची आणि मदरसन सुमी सिस्टम्सने यूएई स्थित कंपनीत 4.17 कोटी डॉलरची गुंतवणूक केली.

Foreign Direct Investment hits all time high in 2021; forex reserves jump over 100 billion

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात