वाढत्या इंधन दरवाढीची भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना देखील चिंता


विशेष प्रतिनिधी

न्यूयॉर्क : सरकारी तेल कंपन्यांनी नुकताच पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. नवीन दरात 35 पैशांनी वाढ झाली आहे. झालेली ही वाढ आजवरची नवी आणि विक्रमी वाढ म्हणून नोंदवण्यात आली आहे. तर आता सामान्य नागरिकांना एक लिटर पेट्रोलसाठी आता 100 हून अधिक रुपयांची किंमत मोजावी लागणार आहे. ही परिस्थिती भारतातील सर्व राज्यांमध्ये पाहायला मिळते आहे.

Due to the increasing prices of petrol and diesel indian finance minister nirmala seetharaman is worried

या सर्व परिस्थितीमुळे सामान्य माणूस हैराण तर आहेच. पण याची चिंता आता देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना देखील लागली आहे. अमेरिकेमधील ब्लूमबर्ग क्विंटन या वृत्तवाहिनीनुसार सीतारमण यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.


Petrol Diesel Price : इंधन तेलाच्या किमती पुन्हा गगनाला भिडल्या, दिल्लीत पेट्रोल 104, तर मुंबईत 110 रुपयांच्या पुढे


कोरोना आणि कोरोनाचे दुष्परिणाम या संदर्भात न्यूयॉर्कमध्ये निर्मला सीतारामन यांनी नुकताच एक इंटरव्यू दिला आहे. या इंटरव्यू दरम्यान त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेसमोर असणारी आव्हाने आणि ती सावरण्याचा सरकार करत असणारे प्रयत्न यावर भाष्य केले आहे. त्याचप्रमाणे वाढलेल्या इंधनाच्या दरामुळे आणि वाढणाऱ्या महागाईमुळे केंद्र सरकारच्या खर्चावर देखील मर्यादा येत आहेत. असे देखील त्यांनी या  मुलाखतीमध्ये सांगितले आहे. जसजसे इंधनाचे दर दररोज वाढत आहेत त्यामुळे माझ्यासमोर खूप मोठे आव्हान आहे. अर्थ विभागातील आमची टीम याकडे पूर्णपणे लक्ष देऊन अभ्यास करत आहे. असे देखील यावेळी सीतारामन यांनी सांगितले आहे.

Due to the increasing prices of petrol and diesel indian finance minister nirmala seetharaman is worried

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात