द्रुमुक नेत्याचे अकलेचे तारे, म्हणे परदेशी गाईचे दूध पिल्याने महिला जाड्या होतात, फिगर गमावतात

तामीळनाडूतील विधानसभा निवडणुकीत द्रविड मुनेत्र कळघमच्या (द्रुमुक) एका नेत्याने अकलेचे तारे तोडले आहेत. परदेशी गाईचे दूध पिल्यानेच महिला जाड्या होतात. फुग्यासारख्या फुगतात, असे त्याने म्हटले आहे.DMK leaders remarks , says that women become fat and lost figer by drinking the milk of foreign cow


विशेष प्रतिनिधी 

चेन्नई : तामीळनाडूतील विधानसभा निवडणुकीत द्रविड मुनेत्र कळघमच्या (द्रुमुक) एका नेत्याने अकलेचे तारे तोडले आहेत. परदेशी गाईचे दूध पिल्यानेच महिला जाड्या होतात. फुग्यासारख्या फुगतात, असे त्याने म्हटले आहे.

द्रमुकचे नेते दिंडिगल लिओनी यांनी म्हटले आहे की, परदेशी गायींचं दूध प्यायल्यामुळेच आपल्याकडच्या महिलांनी फिगर गमावली असून त्या जाड झाल्या आहेत. लिओनी हे द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे नेते असून कोइम्बतूरमध्ये पक्षाचे उमेदवार कार्तिकेय सिवसेनापती यांच्यासाठी प्रचार करत होते.वसेनापती हे सेनापती केनगयम कॅटल रिसर्च फाऊंडेशनचे ट्रस्टी देखील आहेत. लिओनी म्हणाले, तुम्हाला माहिती आहे का, की अनेक प्रकारच्या गायी असतात. शेतामध्ये तुम्हाला हल्ली परदेशी प्रजातीच्या गायी दिसतील. लोकं या गायींसाठी दूध काढायचं मशिन वापरतात.

दिवसाला ४० लिटर दूध मिळतं. ते दूध प्यायल्यामुळे आपल्या सगळ्या महिला फुग्याप्रमाणे जाड झाल्या आहेत. आधी महिलांची फिगर (इंग्रजीतल्या) आठ आकड्यासारखी होती. मुलांना त्या कंबरेवर ठेवत असतं. पण आता जर त्यांनी मुलांना तसं ठेवलं, तर मुलं देखील घसरून पडतील. कारण महिला आता बॅरलसारख्या झाल्या आहेत. आपली सगळी मुलं देखील जाड झाली आहेत्.

यावेळी लिओनी यांच्या हातात रेशनिंगचा तांदूळ देऊन त्याच्या दर्जावर त्यांनी बोलावं असं सुचवण्याचा प्रयत्न एका कार्यकत्यार्ने केला. त्यावर ते थोडा वेळ बोलले देखील. पण पुन्हा ते महिलांबाबतच्या आपल्या मूळ विषयावर आले, असे व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

द्रुमुक नेत्याच्या पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा कनिमोळी यांच्याकडे लिओनी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जाऊ लागली आहे. लिओनी यांच्यासारखे सरंजामी पुरुष वृत्ती असलेले लोक महिलांचा अपमान करत आहेत. ही तुमच्या पक्षाची भूमिका समजायची का? असा सवालही कनमोळी यांना केला जाऊ लागला आहे.

गरोदरपणात महिलांच्या शरीरात काय बदल होतात, हे लिओनी यांना माहित आहे का? हार्मोन बदल म्हणजे काय त्यांना कळते का? ते कोणते दूध पितात, की त्यांची अक्कलच चालत नाही, असा सवाल महिला कार्यकर्त्या विचारत आहेत.

DMK leaders remarks , says that women become fat and lost figer by drinking the milk of foreign cow

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*