जिल्हा न्यायायाधिश कलाम पाशा यांचा सांस्कृतिक दहशतवाद, शाळेत सुरू असलेला नृत्याचा कार्यक्रम मध्येच थांबविला


विशेष प्रतिनिधी

तिरुअनंतपूरम : केरळमधील पलक्कड येथील जिल्हा न्यायाधीश कलाम पाशा यांचा सांस्कृतिक दहशतवाद समोर आला आहे. प्रसिद्ध मोहिनीअट्टम नृत्यांगना डॉ. नीना प्रसाद यांना सरकारी मोयन एलपी स्कूल, पलक्कड येथे आयोजित कार्यक्रम त्यांनी मध्येच थांबविला. या कार्यक्रमात महाभारताचा एक प्रसंग नृत्यातून मांडला जात होता.District Judge Kalam Pasha’s cultural terrorism stopped the school’s dance program in the middle

कलाम पाशा हे न्यायाधिश पलक्कड शहरातील सरकारी मोयन लोअर प्रायमरी स्कूलजवळ राहतात. शनिवारी रात्री 8.30 च्या सुमारास होणारा नीना प्रसाद यांचा मोहिनीअट्टम शो सुरू होता. या कार्यक्रमामुळे त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांनी पोलीसांना आदेश देऊन कार्यक्रम मध्येच थांबविण्यास भाग पाडले.



न्यायाधीशांच्या आदेशाच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धडक कारवाई केली. कृष्ण आणि अर्जुन यांच्यातील तणावाचे चित्रण करणारा सख्यम नावाचा कार्यक्रम मध्येच थांबविला. यामुळे डॉ. नीना प्रसाद यांना व्यासपीठावरच रडू कोसळले.या घटनेनंतर डॉ प्रसाद म्हणाले, माझ्या नृत्य कारकिदीर्तील हा सर्वात कटू अनुभव होता. दोन वर्षांहून अधिक काळ तालीम कयरून मोठ्या आशेने रंगमंचावर आलेल्या सहकलाकारांसाठी हा अनुभव अपमानास्पद होता.

या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना पुरोगमना कला साहित्य संघाने न्यायाधीशांवर सांस्कृतिक असहिष्णुता दाखवल्याचा आरोप केला. सोमवारी एका निवेदनात संघमचे अध्यक्ष शाजी एन करुण आणि सरचिटणीस अशोकन चारुविल यांनी कलाकार आणि सांस्कृतिक नेत्यांना गप्प करण्याच्या प्रयत्नांना विरोध करण्याचे आवाहन केले.

राज्याने आपली कला आणि संस्कृती यांच्यावर अतिक्रमण करण्याच प्रयत्न हाणून पाडावा, असे आवाहन साहित्य संघाने म्हटले आहे. केरळचे लोक नेहमीच नोकरशहा आणि न्यायाधीशांपेक्षा कलाकारांना अधिक आदर आणि महत्त्व देतात. आपल्या माजी पंतप्रधानांनी एमएस सुब्बूलक्ष्मी यांना उच्च स्थान दिले होते हे आठवण्याची गरज आहे.

न्यायाधीश पाशा वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी पाशा यांच्यावर त्यांच्या पत्नीने तिहेरी तलाकद्वारे बेकायदेशीरपणे घटस्फोट दिल्याचा आरोप केला होता. त्यांच्याविरुद्ध कारवाईसाठी तक्रार नोंदवण्यासाठी केरळ उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

तक्रारीत म्हटले होते की, न्यायाधीश कलाम पाशा यांनी 1 मार्च 2018 रोजी एका पत्राद्वारे तिच्याविरुद्ध तिहेरी तलाक जारी केला होता. नंतर तिला दुसरे पत्र पाठवले आणि पत्रात टायपिंग त्रुटी असल्याचा दावा केला. पत्रात म्हटले आहे की तिहेरी तलाक जारी करण्याची मूळ तारीख 1 मार्च 2017 होती.

न्यायाधीशांच्या पत्नीने न्यायमूर्ती बी कलाम पाशा आणि त्यांच्या भावावर घटस्फोटास नकार दिल्यास तिला गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिल्याचा आरोपही केला. विशेष म्हणजे आरोपी न्यायाधीश कलाम पाशा यांचे भाऊ बी केमल पाशा हे केरळ उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आहेत.

District Judge Kalam Pasha’s cultural terrorism stopped the school’s dance program in the middle

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात