DHFLs Wadhwan brothers thousands of crores scam in PM Awas scheme, exposed by CBI

DHFLच्या वाधवान बंधूंचा आणखी एक कारनामा, PM Awas योजनेतील हजारो कोटींचा घोटाळ्याचा CBIने केला पर्दाफाश

दिल्ली हाऊसिंग फायनान्स लिमिटेड अर्थात डीएचएफएलचे (DHFL) संचालक वाधवान बंधू यांचा नवा घोटाळा समोर आलाय. गोरगरिबांना हक्काचं घर बांधता यावं यासाठी मोदी सरकारने आणलेल्या पंतप्रधान आवास योजनेत या वाधवान बंधूंनी मोठ्ठा घोटाळा केलाय. त्यांच्या या हजारो कोटींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश सीबीआयने केलाय. पाहुयात काय आहे हा घोटाळा… DHFLs Wadhwan brothers thousands of crores scam in PM Awas scheme, exposed by CBI


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्ली हाऊसिंग फायनान्स लिमिटेड अर्थात डीएचएफएलचे संचालक वाधवान बंधू यांचा नवा घोटाळा समोर आलाय. गोरगरिबांना हक्काचं घर बांधता यावं यासाठी मोदी सरकारने आणलेल्या पंतप्रधान आवास योजनेत या वाधवान बंधूंनी मोठ्ठा घोटाळा केलाय. त्यांच्या या हजारो कोटींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश सीबीआयने केलाय. पाहुयात काय आहे हा घोटाळा…

असे आहे प्रकरण…

गतवर्षी अवघ्या देशात जेव्हा कडक लॉकडाऊन होतं, त्या काळात सर्व नियम डावलून वाधवान कुटुंबाला ठाकरे सरकारने मुंबईहून महाबळेश्वरला जाण्याची परवानगी दिली होती. यामुळे सरकारवर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली होती. सर्वसामान्यांसाठी संचार बंद असताना वाधवान कुटुंबाला ही सवलत का? असा सवाल तेव्हा विचारण्यात आला होता. आता याच वाधवन बंधूंनी पंतप्रधान आवास योजनेत फसवणूक केल्याचे समोर आलंय. या प्रकरणात डीएचएफएलचे संचालक कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांनी बनावट गृह कर्ज खाती तयार केली. या गृह कर्जांची एकूण रक्कम तब्बल 14 हजार कोटी एवढी आहे. याद्वारे वाधवान बंधूंनी इंट्रेस्ट सबसिडीच्या माध्यमातून 1880 कोटी कमावल्याचा आरोप करण्यात आलाय.

गरिबांच्या मदतीसाठी पीएम आवासची सुरुवात

गोरगरिबांना आपले हक्काचे घर बांधता यावे यासाठी सरकारने 2015 मध्ये पीएम आवास योजना सुरू केली होती. तुम्ही जर बँकेकडे गृहकर्ज काढून योजनेत अर्ज केला तर बँका सरकारकडे या सबसिडीसाठी दावा करतात. बँका या योजनेचा फायदा आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातील लोकांना देतात. त्यांना व्याजावरील रकमेत यातून अनुदान मिळते.

वाधवान बंधूंकडून सरकारची महाफसवणूक

सीबीआयच्या म्हणण्यानुसार, डिसेंबर 2018 मध्ये डीएचएफएलने आपल्या गुंतवणूकदारांना सांगितले की, त्यांनी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आतापर्यंत 88,651 गृह कर्जावर प्रक्रिया केली. या माध्यमातून त्यांनी 539 कोटी रुपयांचे अनुदान मिळविले असून, 1347 कोटी अनुदान अद्याप मिळालेले नाही. सध्या वाधवान बंधू फसवणूक आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी तुरुंगात आहेत. त्यात आता या हजारो कोटींच्या घोटाळ्याची भर पडली आहे. सीबीआयने हा महाघोटाळा समोर आणल्याने अवघ्या अर्थविश्वात खळबळ उडाली आहे. यामुळे वाधवान बंधूंची पुढची वाट बिकट असणार हे निश्चित!

DHFLs Wadhwan brothers thousands of crores scam in PM Awas scheme, exposed by CBI

महत्त्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*