मोदींचा बांगलादेश मुक्तीसंग्राम सुवर्णजयंती समारंभात गौरव; पश्चिम बंगालमध्ये प्रचारात ममतांचे मोदींवर वैयक्तिक अश्लाघ्य हल्ले!!

विशेष प्रतिनिधी

कोलकाता :  ढाका – वंगभूमीच्या राजकीय इतिहासात आजचा दिवस अतिशय वेगळा ठरला… एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेश मुक्तीच्या सुवर्णजयंती कार्यक्रमात अभिमानाने सामील झाले होते, तर दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये विधानसभेचा प्रचार शिगेला पोहोचला असताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अश्लाघ्य टिपण्णी करीत होत्या.Dhaka, Bangladesh: PM Modi speaks at the National Day program as its Guest of Honour

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ढाक्यामध्ये बांगलादेशाच्या मुक्तीसंग्रामाच्या सुवर्णजयंती महोत्सवाचे प्रमुख पाहुणे म्हणून सामील झाले होते. यावेळी त्यांनी केलेल्या औचित्यपूर्ण भाषणात त्यांनी भारत – बांगलदेश यांचा एक इतिहास – एक वर्तमान आणि एक भविष्य यावर भर दिला.बांगलादेश मुक्तीसंग्रामात फील्डमार्शल सॅम माणेकशांपासून, जेएफआर जेकब, कॅप्टन मोहन नारायणराव सावंत यांच्यापर्यंतच्या वीर जवान योध्द्यांचे मोदींनी गौरवपूर्ण स्मरण केले.बांगलादेश मुक्तीसंग्राम राष्ट्रीय़ मेमोरियल या जवानांना समर्पित आहे.

तेथे बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद यांच्यासह जाऊन पंतप्रधान मोदींनी भारताच्या वतीने पुष्पचक्र अर्पण केले. दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, वंगबंधू शेख मुजिबूर रहमान यांच्या अतुलनीय योगदानाचे स्मरण केले. त्याचवेळी त्यांनी अटल बिहारी वाजपेयी आणि प्रणव मुखर्जी यांनी बांगलादेश मुक्तीसंग्रामाचा कशा भावनापूर्ण शब्दांमध्ये गौरव केला होता, याचीही आठवण करवून दिली.

पंतप्रधान मोदींनी भारत – बांगलादेश यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाविषयी उल्लेख केला. त्याचवेळी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा दोन्ही देशांना धोका असल्याचाही इशारा दिला. दहशतवादी शक्तींशी भारत – बांगलादेश यांनी एकत्र येऊन मुकाबला केला पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.

त्याचवेळी शेख हसिना वाजेद यांनी बांगलादेश मुक्तीसंग्रामात तमाम भारतीयांच्या मदतीविषयी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच भारत – बांगलादेश मैत्रीच्या सुवर्णजयंतीविषयी देखील औचित्यपूर्ण उल्लेख केला.

ममतांच्या अश्लाघ्य टिपण्या

तिकडे पंतप्रधान मोदी बांगलादेशात बंगाली संस्कृतीच्या वारशाचा गौरव करीत होते. तर इकडे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मोदींच्या नावाने बोटे मोडत होत्या. प्रचाराची खालची पातळी गाठताना ममतांनी मोदींवर वैयक्तिक हल्ले केले. मोदींचा स्र्कू ढिल्ला आहे. ते स्वतःला रवींद्रनाथ टागोर समजतात. स्वतःचेच नाव स्टेडियमला देण्यात धन्यता मानतात, अशा शब्दांमध्ये ममतांनी मोदींवर दुगाण्या झाडल्या.

राजकीय प्रचारात ममतांनी जातीवादही आणला. मला हिंदुत्व कोणी शिकवू नये. मी ब्राह्मण जातीत जन्माला आलेय, वगैरे विधाने देखील त्यांनी केली.

Dhaka, Bangladesh: PM Modi speaks at the National Day program as its Guest of Honour

 

 

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*