दिल्लीत सर्वाधिक आत्महत्या; ३,०२५ जणांनी जीवन संपविले; ५३ शहरांच्या तुलनात्मक अहवालात स्पष्ट


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या ताज्या आकडेवारीनुसार २०१९ च्या तुलनेत गेल्या वर्षी आत्महत्यांमध्ये १०% वाढ झाली. २०२० मध्ये देशात एकूण १,५३,०५२ आत्महत्या झाल्या. आत्महत्येचे प्रमाण ८.७% ने वाढले. ५३ शहरांच्या अभ्यासात दिल्लीत सर्वाधिक आत्महत्या झाल्याचे उघड झाले आहे. Delhi has the highest number of suicides; 3,025 killed; Clear in the comparative report of 53 cities

३,०२५ आत्महत्यांसह दिल्लीचे ५३ शहरांमध्ये प्रथम क्रमांक त्यानंतर चेन्नईमध्ये २,४३०, बेंगळुरू (२,१९६) आणि मुंबई (१,२८२) आत्महत्या झाल्या. या चार शहरांमध्ये मिळून एकूण ५३ शहरांमधील एकूण प्रकरणांपैकी ३७.४% प्रकरणे आढळली. २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये चेन्नईने किंचित घट दर्शविली तर दिल्लीत २४.८%, बेंगळुरू ५.५% आणि मुंबईने ४.३% वाढ नोंदवली.



कौटुंबिक समस्या आणि आजार हे लोकांना टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडणारे प्रमुख घटक ठरले आहेत. गतवर्षी मजूर, त्यानंतर स्वयंरोजगार असलेल्या व्यक्ती (पुरुष) आणि गृहिणींचं प्रमाण सर्वाधिक आहे. एकूण १,०८,५३२ पुरुषांनी जीवन संपवले, सर्वाधिक रोजंदारीवर काम करणारे (३३,१६४) त्यानंतर स्वयंरोजगार (१५,९९०) आणि बेरोजगार व्यक्ती (१२,८९३) असल्याच अहवालात नमूद केले आहे.

Delhi has the highest number of suicides; 3,025 killed; Clear in the comparative report of 53 cities

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात