संरक्षण मंत्रालय : 2025 पर्यंतचे 175000 कोटी रुपयांचे संरक्षण उत्पादन टार्गेट!!; 35000 कोटींचे निर्यातीचाही समावेश


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने सन 2025 पर्यंत तब्बल 1 लाख 75 हजार कोटी रुपयांचे संरक्षण उत्पादन टार्गेट ठेवले आहे. यामध्ये संरक्षण उत्पादनाच्या तब्बल 35000 कोटींच्या निर्यातीची देखील संभावना आहे. Defense production target of Rs 175000 crore by 2025

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राजधानी नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात संरक्षण मंत्रालयाचे पुढचे व्हिजन सांगितले. यामध्ये देशातील ऑर्डिनन्स फॅक्टरींचे रूपांतर संरक्षण उत्पादन कंपन्यामध्ये केल्यानंतर त्यांच्याकडे सोपविलेल्या विविध संरक्षण उत्पादनांचा समावेश आहे.

देशाच्या संरक्षण गरजेचा अनुसार ही उत्पादने या कारखान्यांमध्ये तयार होतील. किंबहुना संरक्षण साहित्य उत्पादनात 70 ते 80 % योगदान याच कंपन्यांचे असेल. परंतु, काही खाजगी कंपन्यांकडे सोपविलेल्या उत्पादनांचाही या मध्ये समावेश आहे.

सरकारी आणि खाजगी कंपन्यांद्वारे केलेली उत्पादने जगभरातल्या 12 देशांना निर्यातीची योजना आहे. ही उत्पादने 1 लाख 75 हजार कोटी रुपयांची असतील आणि त्यातली 35000 कोटींची उत्पादने निर्यात करता येतील, असे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले आहे.

Defense production target of Rs 175000 crore by 2025

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात