‘’राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यात डील’’ काँग्रेसचा युक्तिवाद!

ADHIR RANJAN CHOUDHARY

जाणून घ्या काँग्रेस खासदार राहुल गांधींनी नेमके काय आरोप केले आहेत

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राहुल गांधी यांनी लंडनमध्ये दिलेल्या वक्तव्यावरून भाजप संसदेपासून ते रस्त्यापर्यंत काँग्रेसला घेराव घालत आहे. दरम्यान, काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात “राहुल गांधी आणि काँग्रेसची प्रतिमा खराब करण्यासाठी” करार झाल्याचा आरोप केला. Deal between Prime Minister Modi and Mamata Banerjee to defame Rahul Gandhi Congress argument

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना  अधीर रंजन चौधरी म्हणाले, “ममता बॅनर्जी पंतप्रधानांच्या सूचनेनुसार बोलत आहेत. राहुल गांधी आणि काँग्रेसची प्रतिमा खराब करण्यासाठी पंतप्रधान आणि ममता बॅनर्जीत यांच्यात डील आहे. त्यांना स्वतःला ईडी, सीबीआयच्या छाप्यांपासून वाचवायचे आहे. म्हणूनच त्या काँग्रेसच्या विरोधात आहे आणि पंतप्रधानांना याचा आनंद होईल.’’

पश्चिम बंगालमध्ये मे आणि जूनमध्ये पंचायत निवडणुका होण्याची शक्यता आहे. चौधरी यांनी सांगितले की सुमारे दोन हजार तृणमूल, भाजप कार्यकर्ते हातात काँग्रेस पक्षाचा झेंडा घेऊन बहरामपूर काँग्रेस कार्यालयात काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत.

ममता बॅनर्जी राहुल गांधींबाबत काय म्हणाले–

ममता म्हणाल्या की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ब्रिटनमध्ये केलेल्या वक्तव्याचा मुद्दा बनवून संसदेच्या कामकाजात भाजप व्यत्यय आणत आहे आणि ज्वलंत मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यासाठी त्यांना ‘हीरो’ बनवण्याचा प्रयत्न करत आहे. राहुल गांधी विरोधी पक्षनेते राहिले तर नरेंद्र मोदींना कोणीही लक्ष्य करू शकत नाही.

Deal between Prime Minister Modi and Mamata Banerjee to defame Rahul Gandhi Congress argument

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात