लालू – चौटाला – देशमुख : बहराच्या वयातले भ्रष्टाचार; उतार वयातले खटले, राजकीय सहानुभूतीसाठी आसुसले!!


लालूप्रसाद यादव, ओमप्रकाश चौटाला आणि अनिल देशमुख… आपापल्या राज्यांचे राजकारण गाजविणाऱ्या नेत्यांची अवस्था आज जवळजवळ एकच झाली आहे!! बहराच्या राजकीय वयातले भ्रष्टाचार आणि त्यांना तोंड देत उतार वयातील खटले लढवताना हे तीनही नेते मेटाकुटीला आले आहेत. Deaf age corruption; Decades of lawsuits, aspirations for political sympathy

– छातीत दुखल्यामुळे देशमुख केईएम रुग्णालयात

अनिल देशमुख यांच्या छातीत आणि खांद्याच्या दुखण्यामुळे आजच दुपारी त्यांना मुंबईतील केईएम रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल केले आहे. त्यांचे वय आता 75 च्या पुढे आहे. त्यामुळे शरीरातले सगळे अवयव बोलायला लागले असतील तर त्यात नवल नाही. पण 100 कोटींच्या वसुलीचा खटलाच एवढा मोठा आहे की त्यातून अनिल देशमुख सक्तवसुली संचालनालय ईडी आणि सीबीआय यांच्या कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. त्यातही आता सचिन वाझे माफीचा साक्षीदार बनायला तयार झाल्यामुळे देशमुखांच्या कायदेशीर अडचणीत प्रचंड वाढ झाली आहे. सचिन वाझेची माफीची साक्ष देशमुखांसकट अनेक बड्या नेत्यांना कायदेशीर कचाट्यात अडकणार आहे आणि हे खटले दीर्घकाळ चालणार आहेत!!

– लालूप्रसादांवरचे खटले

लालूप्रसाद यादव यांची अवस्था देखील वेगळी नाही. चारा घोटाळ्यातील शिक्षा भोगून ते बाहेर येतात ना तोच ज्ञात स्रोतांपेक्षा जादा संपत्ती जमवल्याचा त्यांच्यावर खटला लागला आहे. लालूप्रसाद यादव यांना देखील अनेक व्याधी आहेत. मध्यंतरी त्यांच्या तब्येतीची चौकशी दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे पुत्र तेजस्वी यादव यांच्याकडे केली होती. पण त्यांच्यावर सुरू असलेल्या कायदेशीर खटल्यांमध्ये त्याचा कोणताही फरक पडला नाही. दोनच दिवसांपूर्वी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने लालूप्रसाद यांच्या घरांवर नव्याने छापे घातले आहेत.

– चारा घोटाळा भोवतो आहे

लालूप्रसाद यादव 1990 च्या दशकात बिहारचे मुख्यमंत्री होते. त्या दशकातला चारा घोटाळाच त्यांना आता 75 री ओलांडल्यानंतर कोर्टाच्या पायर्‍या चढायला आणि उतरायला लावतो आहे. एक खटला संपला नाही, तोच दुसरा खटला उभा राहतो आहे.



– चौटालांपाठीमागे खटल्यांचा ससेमिरा

असाच प्रकार हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांच्याबाबतीत घडला आहे. त्यांनी तर या दोन्ही नेत्यांपेक्षा आपली वयाची मर्यादा ओलांडली आहे. ते वयाची 85 वर्षे ओलांडून पुढे गेले आहेत. पण तसे तगडे आहेत. त्यांच्याविरोधात ज्ञात स्वतःपेक्षा जास्त संपत्ती जमा केल्याचा खटला सुरू असताना आता त्यांना 4 वर्षांची शिक्षा सुनावल्याची बातमी आली आहे. या वयात आता तुरुंगाची वारी घडणे अपरिहार्य आहे.

मध्यंतरी त्यांनी बारावीची परीक्षा उत्तीर्ण केल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये आली होती. सोशल मीडियावर त्यांच्या जिद्दीचे कौतूक देखील झाले होते. पण त्यांनी आपल्या राजकीय बहराच्या काळामध्ये जो भ्रष्टाचार केला, भरती घोटाळा केला त्याची सजा त्यांना उतारवयात भोगायला लागली ही वस्तुस्थिती त्यामुळे लपत नाही.

– कोर्टातले खटले नेतेच लांबवतात

अनिल देशमुख, लालूप्रसाद यादव आणि ओमप्रकाश चौटाला या तिघांच्याही तिघांचीही सेम कहाणी आहे. पण यामध्ये खुद्द त्यांचे दोष खूप मोठे आहेत. बहराच्या वयात भ्रष्टाचार करणे आणि नंतर त्याचा मुकाबला करण्यासाठी उतारवयात कोर्टामध्ये जाऊन लढणे हे त्यांनी स्वतःच्या हाताने आपल्या नशिबी वाढून आणले आहे. कोर्टाचे खटले याच नेत्यांनी मोठमोठे वकील देऊन दीर्घकाळ लांबवले आहेत. त्यासाठी कायद्याच्या फटी शोधल्या आहेत. दरम्यानच्या काळात राजकीय सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. आपापल्या वारसदारांचे राजकीय बस्तान बसवण्याचा प्रयत्न केला आहे.

या सगळ्या घडामोडींमध्ये त्यांची वये वाढली हा काही काळाचा दोष असू शकत नाही. खुद्द त्यांचीच “राजकीय कर्तृत्वे” अशी आहेत की त्यामुळेच त्यांना उतारवयात भ्रष्टाचाराच्या खटल्यांना सामोरे जावे लागत आहे. पण एवढे होऊनही त्यांच्या “राजकीय खोडी” अजूनही जात नाहीत की त्यांना पश्चाताप झाल्याचे दिसत नाही. राजकीय सहानुभूती मिळवण्याचे त्यांचे आणि त्यांच्या वारसदारांची प्रयत्न अजूनही संपत नाहीत. त्यामूळेच ओमप्रकाश चौटाला यांचे पुत्र अजय चौटाला यांनी आपल्या पिताश्री यांची स्तुती केली आहे. ओमप्रकाश यांनी आपल्या राजकीय जीवनात अनेक चढ-उतार बघितले आहेत. त्यांना झालेल्या शिक्षेविरोधात आम्ही वरिष्ठ न्यायालयात दाद मागू, असे त्यांनी म्हटले आहे. भ्रष्टाचार आणि त्यामुळे न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षा अभय चौटाला यांना राजकीय जीवनातील चढ-उतार वाटत आहेत!!

– रोहित पवारांची देशमुखांच्या घरी भेट

अनिल देशमुख यांच्या बाबतीतही फारसे वेगळे नाही मध्यंतरी शरद पवारांचे नातू आमदार रोहित पवार नागपूरातल्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने अनिल देशमुख यांच्या घरी भेट देऊन आले. देशमुखांच्या कुटुंबीयांचे मनोधैर्य टिकवण्याचा त्यांनी प्रयत्न केला… या भेटीच्या वेळी अनिल देशमुख यांच्या पत्नी च्या डोळ्यात पाणी आल्या च्या बातम्या आल्या…

पण हे सगळे सहन करावे लागते, यातच या राजकीय नेत्यांचे वास्तवातले दुबळेपण दिसून येते!! राजकीय बहराच्या वयात भ्रष्टाचार करायचा आणि उतारवयात खटल्यांना सामोरे जायचे या साखळीत ते स्वतःच्याच राजकीय कर्तृत्वाने अडकले आहेत, हेच यातले वास्तव आहे!! मग त्यांचे वारसदार ते कितीही नाकारोत… ये पब्लिक है सब जानती है!!

Deaf age corruption; Decades of lawsuits, aspirations for political sympathy

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात