CWC Meeting G – 23 : काँग्रेस अध्यक्षासाठी मुकुल वासनिकांचे नाव; जी 23 गटाचे नेते वासनिकांचे भवितव्य घडवताहेत की बिघडवताहेत??


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेस कार्यकारिणीची नवी दिल्लीत बैठक सुरू आहे. या बैठकीच्या आधी जी 23 गटाच्या नेत्यांनी मुकुल वासनिक यांचे नाव काँग्रेसचे अध्यक्षपदासाठी सुचवल्याची बातमी एएनआय वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. CWC Meeting G – 2

पण ही बातमी येताच जी 23 गटाचे नेते मुकुल वासनिक यांचे राजकीय भवितव्य घडवत आहेत? की बिघडवत आहेत??, हा कळीचा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. जी 23 गटापैकी गुलाब नबी आझाद, कपिल सिब्बल हे नेते काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत हजर आहेत. त्यांनीच मुकूल वासनिक यांचे नाव अध्यक्षपदासाठी सुचवले असे सांगण्यात येते. परंतु काँग्रेस कार्यकारिणीने त्यांची ही सूचना फेटाळून लावली आहे.

काँग्रेस कार्यकारिणीची बैठक दुपारी चार वाजता सुरू झाली असून त्यामध्ये नेमका काय निर्णय होतो हे अद्याप बाहेर यायचे आहे. परंतु सूत्रांच्या हवाल्याने जी 23 गटाच्या नेत्यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी कायमस्वरूपी नेत्यांची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी लावून धरली आहे. यातच मुकुल वासनिक यांचे नाव पुढे करण्यात आले. परंतु काँग्रेस कार्यकारिणीने ते फेटाळल्याची बातमी आहे.

– पडद्यामागून राहुल

सोनिया गांधी पक्षाच्या हंगामी अध्यक्ष आहेत. प्रत्यक्षात के. सी. वेणुगोपाल, अजय माकन हेच पक्ष चालवताना दिसत आहेत. परंतु, पक्षाने त्यांच्याकडे ही अधिकृत जबाबदारी सोपवलेली नाही. राहुल गांधी सध्या अध्यक्ष नाहीत. परंतु तेच पडद्यामागून सगळे निर्णय घेत असतात आणि ते काँग्रेसच्या नेत्यांना सरचिटणीस म्हणून के. सी. वेणुगोपाल कळवत असतात. त्यामुळे पक्षात नेमके कोण अधिकृत अध्यक्ष आहे? निर्णय कोण घेत आहे? ही बाब स्पष्ट नाही.

– आम आदमी – तृणमूलचे आव्हान

2024 च्या निवडणुकीत आम आदमी पार्टी अथवा तृणमूल काँग्रेस हे दोन पक्ष काँग्रेससाठी मोठे आव्हान तयार करत आहेत. इतकेच नाही तर हे दोन पक्ष काँग्रेस साठीच राष्ट्रीय पातळीवर पर्याय तयार होतील, अशी भीती आहे. अशा वेळी आत्ताच काँग्रेससाठी पूर्णवेळ अध्यक्ष नेमून पक्षाने पुढची वाटचाल करावी, अशी मागणी जी 23 गटाच्या नेत्यांनी केल्याचे समजते. या मुद्यावर काँग्रेस कार्यकारणीत गंभीर विचारविनिमय सुरू असल्याची बातमी आहे. पण अधिकृत या काँग्रेसचा कोणताही नेता या विषयावर बोलायला तयार नाही.

– राहुल गांधींना आव्हान

जी 23 गटाने मुकुल वासनिक यांचे नाव अध्यक्षपदासाठी सुचविणे म्हणजेच राहुल गांधी यांना थेट आव्हान देण्यासारखेच आहे. स्वतः मुकुल वासनिक याबद्दल शांत असले तरी जर त्यांच्या नावाने राहुल गांधी यांना आव्हान देण्याचा असेल तर मुकुल वासनिक यांचे काँग्रेसमध्ये पुढच्या वर्षा दोन वर्षात नेमके भवितव्य काय असेल याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

– आत्तापर्यंतचा राजकीय अनुभव

जी 23 गटाच्या सर्व नेत्यांची वयोमर्यादा ओलांडून गेली आहे. त्यांना पक्षात काही मिळवायचे नाही आणि मिळणारही नाही. पण त्या नेत्यांनी मुकुल वासनिक यांचे नाव सुचवले म्हणूनच मुकुल वासनिक यांचे राजकीय भवितव्य शंकास्पद करून ठेवण्यासाठी आहे. कारण गांधी घराण्यापुढे कोणाचेही नाव इतरांनी सुचवणे याचाच अर्थ संबंधित नाव राजकीय दृष्ट्या धोक्यात येणे असाच आत्तापर्यंतचा राजकीय अनुभव आहे.

CWC Meeting G – 2

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात