Coronavirus in India : भारतीय प्रवाशांना ४ मेपासून अमेरिकेत प्रवेश बंदी ; जो बायडेन सरकारचा निर्णय


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोनात भारत जगाचा दुसरा हॉटस्पॉट बनला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार माजला आहे. परिस्थिती बिकट बनत आहे. त्यामुळे अमेरिकेने 4 मेपासून भारतीयांना अमेरिकेत येण्यास बंदी घातली आहे. व्हाईट हाऊसने शुक्रवारी याबाबतचे निवेदन प्रसिद्ध केले आहे. America Ban to Enter Indian’s in to Country from 4 May onwards
व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या जेन साकी यांनी निवेदनात म्हटले आहे की,  “ आजार नियंत्रण आणि आटोक्यात आणण्यासाठीच्या भारतातून होणाऱ्या प्रवासावर बंदी घातली आहे.”



जगभरातून मदतीचा ओघ

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या मदतीसाठी अमेरिका, ब्रिटन, सिंगापूर, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, ऑस्ट्रेलिया आणि चीनसह जगातील सुमारे 40 देश मदतीसाठी पुढे आले आहेत. यापैकी अनेक देशांनी वैद्यकीय मदत पाठवली आहे.

अमेरिकेकडून भारताला मदतीचा हात

दरम्यान, अमेरिकेतून कोरोनासंबंधित मदत साहित्य भारतात पोचलं आहे. शेकडो ऑक्सिजन सिलेंडर्स आणि रेगुलेटरसह आपत्कालीन औषध आणि इतर वैद्यकीय सामुग्री घेऊन दोन विमाने शुक्रवारी भारतात दाखल झाली. अमेरिकन हवाई दलातील सर्वात मोठ्या विमानांपैकी एक सी -5 एम हे विमान सुपर गॅलेक्सी वैद्यकीय उपकरणे आणि इतर वैद्यकीय सामुग्री घेऊन दिल्लीला पोचलं. त्याशिवाय अमेरिकेहून मोठ्या प्रमाणात वैद्यकीय उपकरणे व इतर साहित्य असलेले दुसरं विमान सी -17 ग्लोबमास्टरही शुक्रवारी रात्री भारतात पोचले.

America Ban to Enter Indian’s in to Country from 4 May onwards

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात