कॉँग्रेस, द्रुमुकने जुनं टूजी मिसाईल डागलंय, महिलांचा अपमान कधीही सहन करणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठणकावले

महिलांचा अपमान करणं ही काँग्रेस, द्रमुकची संस्कृती आहे. त्यांनी जुनं टूजी मिसाईल डागलं असून त्याला फक्त एकच लक्ष्य आहे, तमिळनाडूच्या महिलांचा अपमान करणे अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. काँग्रेस आणि द्रमुकने आपल्या नेत्यांना आवर घालावा, जनता प्रत्येक गोष्टीची नोंद करीत आहे, महिलांचा अपमान कधीही सहन करणार नाही, असेही मोदी म्हणाले.Congress, DMK fire old 2G missiles, will never tolerate humiliation of women, says PM Narendra Modi


विशेष प्रतिनिधी

चेन्नई : महिलांचा अपमान करणं ही काँग्रेस, द्रमुकची संस्कृती आहे. त्यांनी जुनं टूजी मिसाईल डागलं असून त्याला फक्त एकच लक्ष्य आहे, तमिळनाडूच्या महिलांचा अपमान करणे अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. काँग्रेस आणि द्रमुकने आपल्या नेत्यांना आवर घालावा, जनता प्रत्येक गोष्टीची नोंद करीत आहे, महिलांचा अपमान कधीही सहन करणार नाही, असेही मोदी म्हणाले.

तामिळनाडूमधील धारापुरम येथील मोदींनी भाजपाच्या प्रचारसभेमध्ये या दोन्ही पक्षांवर जोरदार टीका केली. माजी केंद्रीय दूरसंचारमंत्री ए. राजा हे काँग्रेस आणि द्रमुकचे कालबाह््य टूजी क्षेपणास्त्र असल्याचा आरोप करत तमिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांच्या मातोश्रींचा अपमान करून तमिळनाडूतील महिलांना लक्ष्य केल्याबद्दल मोदी यांनी राजा यांना चांगलेच फटकारले आहे.



ते म्हणाले, काही दिवसांपूर्वी द्रमुकचे एक नेते दिंडिगल लिओनी यांनी महिलांबद्दल गंभीर वक्तव्य केलं होतं. द्रमुकने त्यांना थांबवण्यासाठी काहीही केलं नाही. आता युपीएनं त्यांचं जुनं टूजी मिसाईल डागलं आहे. तामिळनाडूच्या नारीशक्तीवर हल्ला करण्याचं टार्गेट या मिसाईलला दिलं आहे. देव न करो, जर ते सत्ते आले, तर ते तामिळनाडूच्या अनेक महिलांचा अपमान करतील.

काही दिवसांपूर्वी द्रविड मुन्नेत्र कळघमचे (द्रमुक) नेते आणि देशाचे माजी दूरसंचार मंत्री ए. राजा यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री इडाप्पडी पलानीस्वामी यांच्याविषयी आक्षपार्ह वक्तव्य केलं होतं. स्टॅलिन यांचा योग्य पद्धतीने, ९ महिन्यांचा काळ काढून, वैध लग्न-विधीनंतरच (राजकीय विश्वात) जन्म झाला आहे.

पण दुसरीकडे इडाप्पडी हे वेळेपूर्वीच जन्मलेले आणि अचानक आलेले मूल आहेत, असे म्हटले होते. रविवारी झालेल्या एका प्रचारसभेत मुख्यमंत्री पलानीस्वामी यांना भाऊक होऊन व्यासपीठावरच रडू कोसळले होते. आपल्या आईविषयीच ही टिपणी असल्याचे त्यांनी म्हटले होते.

ए. राजा यांच्याप्रमाणेच दिंडिगल लिओनी यांनी देखील महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. परदेशी गायींचं दूध प्यायल्याने आपल्याकडच्या महिला ड्रमसारख्या जाड झाल्या आहेत. आधी त्यांचा आकार 8 आकड्यासारखा होता, असे त्यांनी म्हटले होते.

Congress, DMK fire old 2G missiles, will never tolerate humiliation of women, says PM Narendra Modi

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*