पश्चिम बंगालमधील डाव्या पक्षांचे कम बॅक, नगरपालिका निवडणुकीत तृणमूलने गैरप्रकार करूनही चांगली मते मिळविल्याचा कम्युनिस्टांचा दावा


विशेष प्रतिनिधी

कोलकाता : तृणमूल कॉँग्रेसकडून निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होऊनही कम्युनिस्ट पक्ष पश्चिम बंगालमध्ये पुन्हा पाय रोवून उभा राहत असलचा दावा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केला आहे. पश्चिम बंगालमधील अनेक जिल्ह्यांत डाव्या पक्षांना चांगले मतदान झाल्याचे दिसून आले आहे.Communists claim that got good votes in municipal elections in West Bengal

पश्चिम बंगालमधील 107 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपैकी एका नगरपालिकेत डाव्या पक्षांनी बहुमत मिळविले आहे. डावे पक्ष पश्चिम बंगालच्या राजकारणात पुन्हा एकदा पुनरागमन करत आहेत. विरोधी पक्ष म्हणून भाजपने व्यापलेली जागाही घेत आहेत. त्यामुळे तृणमूल कॉँग्रेसला धास्ती वाटत असल्याचे म्हटले आहे.



राज्य निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, उत्तर बंगालच्या दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यात डाव्या आघाडीच्या घटक पक्षांना 21.43 टक्के मते मिळाली.दार्जिलिंग (16.4 टक्के), जलपाईगुडी (15.51 टक्के), कूचबिहार (13.46 टक्के) आणि अलीपुरदुर (13.21 टक्के) ). जंगलमहाल प्रदेशात त्यांना झारग्राम जिल्ह्यात 17.94 टक्के आणि पश्चिम मेदिनीपूरमध्ये 11.63 टक्के मते मिळाली आहेत.

या सर्व जिल्ह्यांमध्ये भाजपने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत प्रभावी कामगिरी केली होती. 2021 च्या विधानसभा निवडणुकीतही भाजपला चांगली मते मिळाली होती. पश्चिम बंगालमध्ये २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत डाव्या आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही.

मात्र, यावेळी काही जिल्ह्यांमध्ये भाजपची मतांची टक्केवारी डाव्या पक्षांपेक्षा कमीकम्युनिस्ट पक्षाचे राज्यसभा खासदार विकास भट्टाचार्य यांनी दावा केला आहे की निवडणुकांमध्ये गैरप्रकार झाला नसता तर तृणमूल कॉँग्रेसला 102 नगरपालिका जिंकताच आल्या नसत्या.

27 फेब्रुवारी रोजी झालेल्या राज्यभरातील 107 नगरपालिकांपैकी नादिया जिल्ह्यातील ताहेरपूर येथे डाव्या आघाडीने विजय मिळविला आहे. तृणमूल आणि भाजप हे दोन्ही पक्ष धर्माचे राजकारण करत आहेत. तृणमूल काँग्रेससमोर खरे आव्हान हे डाव्या आघाडीचे आहे.

Communists claim that got good votes in municipal elections in West Bengal

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात