चिठ्ठी आयी हैं! ममता दिदींचा नवा ‘ खेला ‘ ; सर्व भाजप विरोधी नेत्यांना पत्र ; एकत्र येण्याचे आवाहन

विशेष प्रतिनिधी

 

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजप विरोधात मोहिमच राबवली आहे. आता त्यांनी भाजपला विरोध करणार्या पक्षनेत्यांना  एकत्र येण्याची ‘चिठ्ठी ‘ लिहीली आहे .Chitthi Aayi Hai ! Mamta Didi’s new ‘Khela’; Letters to all anti-BJP leaders; An appeal to come together

भाजप सरकारकडून लोकशाही आणि घटनात्मक संघटनावादावर हल्ले होत असल्याचा आरोप केला आहे.त्यांनी सोनिया गांधी, शरद पवार, एमके स्टालिन, तेजस्वी यादव, उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल यांच्या व्यतिरिक्त ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना पत्र लिहिले आहेत.

पत्रात त्या म्हणतात , “माझा ठाम विश्वास आहे की लोकशाही आणि राज्यघटनेवरील भाजपच्या हल्ल्यांविरोधात एकत्रित आणि प्रभावी संघर्ष करण्याची वेळ आली आहे.”

एनसीटी विधेयकाचा संदर्भ देताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, दिल्लीच्या उपराज्यपाल यांना गृहमंत्री व पंतप्रधान यांचे प्रतिनिधी म्हणून बसवले आहे. त्यांना दिल्लीचा अघोषित व्हाॅइसराॅय बनविण्यात आले आहे.

एनसीटी विधेयक मंजूर होणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे. लोकशाही पद्धतीने निवडल्या गेलेल्या सरकारची सर्व सत्ता भाजप सरकारने काढून घेतली आहे.गैर-भाजप पक्षांचे सरकार असलेल्या राज्यांत केंद्रीय राज्यपाल पदाचा गैरवापर केल्याने निवडलेल्या सरकारांना समस्या निर्माण होत आहेत.

 

ममता यांनी हल्लेखोरांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले मंगळवारी नंदीग्राममध्ये त्यांच्या गाडीवर हल्ला करणार्यांची छायाचित्रे आणि व्हिडिओ त्यांच्याकडे असल्याचे ममता बॅनर्जी यांनी बुधवारी सांगितले आणि निवडणुकीनंतर त्या हा मुद्दा उपस्थित करणार आहेत. निवडणुका होत असल्याने आणि आचारसंहिता लागू झाल्यामुळे त्या कारवाई टाळत असल्याचे म्हणाल्या.

ते माझ्या कारवर हल्ला करण्याची हिंमत करतात.मी निवडणुका असल्यामुळे गप्प आहे. नाहीतर मी त्यांना दाखवले असते की त्यांनी किती मोठी चूक केली आहे. माझ्याकडे गाडीवर हल्ला करणार्या गुंडांचे व्हिडिओ आहेत.

बंगालमध्ये निवडणुका होऊ द्या त्यानंतर मी कारवाई करेन. तुम्हाला कोणते ‘ गद्दार ‘ वाचवतो ते मी पाहतेच ! तूम्ही कुठे पळून जाणार? दिल्ली, बिहार, राजस्थान किंवा उत्तर प्रदेश मध्ये मी तुम्हाला तेथून खेचून आणेल. अशा शब्दांत त्यांनी धमकावले आहे.

 

Chitthi Aayi Hai ! Mamta Didi’s new ‘Khela’; Letters to all anti-BJP leaders; An appeal to come together

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*