कर्नाटकात भाजप युवा आघाडीच्या नेत्याची निर्घृण हत्या, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला निषेध


वृत्तसंस्था

बंगळुरू : कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यात मंगळवारी (26 जुलै) रात्री उशिरा झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यात भाजप युवा शाखेच्या पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आली. त्यामुळे दक्षिण कन्नडमधील बल्लारी आणि पुत्तूर येथील भाजप कार्यकर्त्यांसह युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी होती.Chief Minister Basavaraj Bommai condemned brutal killing of BJP youth leader in Karnataka



भाजप युवा मोर्चाच्या नेत्याच्या मृत्यूमुळे कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त होत असतानाच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ट्विट करून या निर्घृण हत्येचा निषेध केला असून दोषींना लवकरच अटक करण्यात येईल, असे सांगत कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ट्विट करून पीडित कुटुंबातील सदस्यांप्रती तीव्र शोक व्यक्त केला आणि लवकरच न्याय मिळेल असे आश्वासन दिले.

मुख्यमंत्री बोम्मई यांनी केला हत्येचा निषेध

बसवराज बोम्मई यांनी ट्विट करून लिहिले की, ‘दक्षिण कन्नड जिल्ह्यातील आमच्या पक्षाचे कार्यकर्ता प्रवीण नेत्तारू यांची निर्घृण हत्या निषेधार्ह आहे. असे घृणास्पद कृत्य करणाऱ्या आरोपींना लवकरच अटक करून कायद्यानुसार शिक्षा केली जाईल. प्रवीण यांच्या आत्म्यास शांती लाभो. ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, ओम शांती.

दुचाकीस्वार अज्ञात हल्लेखोरांनी घेतला जीव

या प्राणघातक हल्ल्यात सुलिया येथे ठार झालेल्या भाजप युवा मोर्चाच्या नेत्याचे नाव प्रवीण नेतारू असून ते भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सचिव होते. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण कन्नड येथील बेल्लारे येथे मंगळवारी सायंकाळी उशिरा दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी प्रवीण नेतारू यांच्यावर कुऱ्हाडीने वार करून त्यांची हत्या केली. सध्या बेल्लारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Chief Minister Basavaraj Bommai condemned brutal killing of BJP youth leader in Karnataka

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात