पाकिस्तानी खेळाडूमुळे मिळाला चेतेश्वर पुजाराला न्याय, इंग्लिश खेळाडू जॅक ब्रुक्सने वर्णद्वेषी वर्तनाबद्दल मागितली माफी


विशेष प्रतिनिधी

लंडन : पाकिस्तानी वंशाच खेळाडू अझीम रफिक याने केलेल्या संघर्षामुळे भारतीय क्रिकेट खेळाडू चेतेश्वर पुजारा यालाही न्याय मिळाला आहे. इंग्लिश क्रिकेट खेळाडू जॅक बु्रक्सने आपल्या वर्णद्वेषी वर्तनाबद्दल भारताचा खेळाडू चेतेश्वर पुजारा याची माफी मागितली आहे. ब्रुक्स स्टिव्ह नावाने चेतेश्वरला हाक मारत असे. त्यामुळे सर्वच जण त्याच नावाने हाक मारू लागले.Cheteshwar Pujara gets justice due to Pakistani player, English player Jack Brooks apologizes for racist behavior

आपली भाषा योग्य नव्हती असे ब्रुक्सने म्हटले आहे.अझीम रफिक हा पाकिस्तानी वंशाचा खेळाडू आहे. यॉर्कशायर क्लबकडून तो अनेक सामने खेळला होता. त्याने आपल्याला वंशद्वेषी वागणूक मिळत असल्याचा आरोप केला होता. वंशद्वेषामुळेच आपले क्रिकेटमधील करीअर उध्दवस्त झाल्याचे त्याने म्हटले होते.



याची दखल घेऊन ब्रिटिश संसदेकडून चौकशी सुरू आहे. अझिम रफिकची संसदीय समितीसमोर साक्षही झाली. या साक्षीमध्ये रफिक याने केवळ आपणच नव्हे तर इतरही खेळाडू वंशद्वेषाची शिकार झाल्याचे सांगितले होते. चेतेश्वर पुजाराला इंग्लिश खेळाडू स्टिव्ह नावाने हाक मारत. रफिकच्या या आरोपानंतर ब्रुक्स याने चेतेश्वर पुजाराची माफी मागितली आहे.

ब्रुक्सने म्हटले आहे की, मी कबूल करतो की मी 2012 मध्ये केलेल्या दोन ट्विटमध्ये वापरलेली भाषा अस्वीकार्य होती. अशी भाषा वापरल्याबद्दल मला मनापासून खेद वाटतो. ज्या लोकांची नावे उच्चारण्यास कठीण आहेत त्यांना स्टिव्ह असे म्हटले जाते. मात्र, ड्रेसींगच्या रुमच्या खेळकर वातावरणात हे घडले होते. मात्र, वंश किंवा पंथाची पर्वा न करता टोपणनाव देणे चुकीच आहे. तरीही मी हे नाव वापरले. असे करणे अनादरकारक आणि चुकीचे होते हे मी कबूल करतो.

चेतेश्वर किंवा त्याच्या कुटुंबाच्या मनस्तापास कारणीभूत ठरलेल्या माझ्या गुन्ह्यासाठी मी याच्याशी संपर्क साधून माफी मागितले. माझे वर्तन वर्णद्वेषी असल्याचे त्यावेळी मला समजले नाही. परंतु, आता मला समजले आहे की तसे करणे योग्य नव्हते.

Cheteshwar Pujara gets justice due to Pakistani player, English player Jack Brooks apologizes for racist behavior

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात