30 लाख मेट्रिक टन गहू खुल्या बाजारात विक्रीची केंद्राची परवानगी; गहू, आटा किंमत नियंत्रणाचे पाऊल


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशातील गहू, आटा यांच्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने एक मोठे पाऊल उचलले असून देशातल्या उपलब्ध गहू साठ्यापैकी 30 लाख मेट्रिक टन गहू खुल्या बाजारात विक्रीची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. Center permits sale of 30 lakh metric tonnes of wheat in open market

हा 30 लाख टन मॅट्रिक मेट्रिक टन गहू अडते, राज्य सरकारे, सहकारी संस्था,सहकारी फेडरेशन तसेच सार्वजनिक वितरण प्रणाली याद्वारे खुल्या बाजारात विक्रीस उपलब्ध होईल. त्यामुळे बाजारात गहू टंचाई भासणार नाही. त्याचबरोबर गहू आणि आटा याच्या किंमती विशिष्ट पातळीपेक्षा वाढणारही नाहीत. त्या किंमती वाढू नयेत आणि केंद्र सरकारला अपेक्षित असणाऱ्या नियंत्रणात राहाव्यात म्हणूनच एवढ्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध साठ्यातील गहू खुल्या बाजारात विक्रीची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे.



2023 च्या रब्बी हंगामात गहू, तृणधान्ये आणि तेलबिया यांच्या पेरणीचा विक्रम झाला आहे. ही तृणधान्ये, डाळी आणि तेलबिया आणखी 4 ते 5 महिन्यात उपलब्ध होतील. केंद्र सरकारने यंदाचे वर्ष बाजरी वर्ष म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे बाजरीची देखील विक्रमी लागवड झाली आहे. 2023 च्या सणवाराच्या काळात धान्य आणि तेल यामध्ये स्वयंपूर्णता प्राप्त झाली तर त्याचा फार मोठा लाभ शेतकरी आणि ग्राहकांना होणे अपेक्षित आहे.

Center permits sale of 30 lakh metric tonnes of wheat in open market

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात