वृत्तसंस्था
नवी दिल्ली – देशभरातील ३० बँकांमधील ३७०० कोटी रूपयांच्या घोटाळ्याच्या तपासासाठी सीबीआयच्या पथकांनी आज ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यातील सुमारे १०० ठिकाणांवर जाऊन छापे घातले. सीबीआयच्या अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली. CBI today conducted searches at over 100 places in 11 states/UTs in connection with more than 30 cases of bank fraud amounting to over Rs 3,700 crores
या छाप्यांमध्ये हजारो कागदपत्रे, लॅपटॉप्स, कॉम्प्युटर्स यांसारखे इलेक्ट्रॉनिक पुरावे, तसेच अनेक डिजिटल पुरावे सीबीआयच्या पथकांनी गोळा केले. या प्रचंड माहितीसाठ्याची छाननी करून पुढील काही दिवसांमध्ये बड्यांपासून छोट्यांपर्यंत अनेक गुन्हेगारांवर कारवाई करण्यात येईल. ३७०० कोटी रूपये एवढी प्रचंड रक्कम त्यांच्याकडून वसूल करण्यात येईल, असेही सीबीआयच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
या आधीच येस बँक प्रकरण तसेच डीएचएफएल प्रकरण यांच्यात सीबीआयने छापेमारी तसेच कोर्ट केसेस करून बड्या गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाया केल्या आहेत. यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या जावयाचा आणि मुलीचाही समावेश आहे. तसेच वधवान बंधू आणि येस बँकेचा माजी सीईओ राणा कपूर या सगळ्यांच्या विविध प्रकारच्या संपत्तीवर कोर्टाच्या परवानगीने आणि सेबीच्या परवानगीने टाच आणली आहे. शेकडो कोटी रूपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.
In a nationwide special drive, CBI today conducted searches at over 100 places in 11 states/UTs in connection with more than 30 cases of bank fraud amounting to over Rs 3,700 crores: CBI
— ANI (@ANI) March 25, 2021
आज सीबीआयच्या पथकांनी १०० ठिकाणांवर केलेली कारवाई त्याचाच पुढचा टप्पा आहे. यातही सीबीआयच्या हाती मोठे घबाड लागण्याची अपेक्षा असून आणखीही बडी नावे यातून पुढे येण्याची शक्यता आहे.