कॅप्टन – काँग्रेस पुन्हा घमासान; आमदारांचा पाठिंबा नसेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा ;सुरजेवाला; मी एकही निवडणूक गमावलेली नाही ;अमरिंदर सिंग


वृत्तसंस्था

नवी दिल्ली /चंडीगड : कॅप्टन अमरिंदरसिंग आणि काँग्रेस यांच्यात पुन्हा घमासान सुरु झाली आहे. यावेळी काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि कॅप्टन साहेब स्वतः आमने सामने आले आहेत.Captain – Congress Ghamasan again; If there is no support from MLAs, CM should resign: Surjewala; I have not lost a single election: Amarinder Singh

आमदारांचा विश्वास राहिला नसेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, असे वक्तव्य रणदीप सुरजेवाला यांनी केले आहे. पंजाब मध्ये काँग्रेसच्या 79 पैकी 78 आमदारांनी नेतृत्व बदलाची मागणी उचलून धरली होती, असा दावा रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे.



या दाव्याला कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 2017 पासून एकही निवडणूक पंजाब मध्ये काँग्रेस हरलेली नाही. माझ्या नेतृत्वाखाली सर्व निवडणुका काँग्रेसने जिंकल्या आहेत, याची आठवण कॅप्टन साहेबांनी सुरजेवाला यांना करून दिली आहे.

नवज्योत सिंग सिद्धू यांच्या नेतृत्वात काँग्रेसने अशी कोणती कामगिरी केली?, की त्यामुळे काँग्रेसच्या हायकमांडने त्याच्यावर विश्वास विश्वास ठेवून पंजाब मध्ये नेतृत्व बदल घडवला, असा सवाल कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी केला आहे. स्वतः नवज्योत सिंग सिद्धू यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन काँग्रेस हायकमांडलाच तोंडघशी पाडल्याचे कॅप्टन साहेबांनी पुन्हा एकदा लक्षात आणून दिले.

Captain – Congress Ghamasan again; If there is no support from MLAs, CM should resign: Surjewala; I have not lost a single election: Amarinder Singh

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात