उत्तर प्रदेशात इझ ऑफ डूईंग बिझनेस, नोईडामध्ये १३ कंपन्या डाटा सेंटर उभारणीसाठी गुंतवणार २२ हजार कोटी रुपये, हैद्राबाद, बंगळुरूलाही टाकणार मागे


उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील गुंतवणूक वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. उत्तर प्रदेशात इझ ऑफ डूईंग बिझनेस प्रत्यक्षा आले आहे. त्यामुळे नोईडामध्ये डाटा सेंटर उभारणीसाठी १३ कंपन्यांनी २२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे. यामुळे डाटा सेंटर्समध्ये नोईडा हैद्राबाद, बंगळुरू आणि मुंबईलाही मागे टाकणार आहे.Business in Uttar Pradesh, 13 companies to invest Rs 22,000 crore to set up data centers in Noida, Hyderabad, Bangalore


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील गुंतवणूक वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. उत्तर प्रदेशात इझ ऑफ डूईंग बिझनेस प्रत्यक्षा आले आहे. त्यामुळे नोईडामध्ये डाटा सेंटर उभारणीसाठी १३ कंपन्यांनी २२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे. यामुळे डाटा सेंटर्समध्ये नोईडा हैद्राबाद, बंगळुरू आणि मुंबईलाही मागे टाकणार आहे.

डाटा सेंटर मार्केट अपडेटच्या एका अहवालानुसार दिल्ली- एनसीआर डाटा सेंटरचे केंद्र म्हणून पुढे येणार आहे. या १३ कंपन्यांमध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा समावेश आहे. यामध्ये हिरानंदानी ग्रुपचा समावेश आहे. त्यांनी सहा हजार रुपये गुंतवणूक करून प्रकल्प उभारण्यासाठी तयारीसुरू केली आहे.



अदानी ग्रुपही ५० एमडब्ल्यूचा प्रकल्प ४९०० कोटी गुंतवणूक करणार आहे. इंडोस्पेस कॅपीटल अ‍ॅडव्हायजर्स दीड हजार कोटी रुपये गुंतवणार असून त्यासाठी जागेची मागणीही केली. इंग्लंडमधील एनटीटी डाटा सेंटर्स ही कंपनीहीदीड हजार कोटी रुपये गुंतवून ७० एमडब्ल्यूचा प्रकल्प उभारण्यास तयार आहे.

याशिवाय उत्तर प्रदेश सरकारकडे सिफी टेक्नालॉजीज, सीटीआरएलएस डाट, सेंटरर्स, वेब वर्कस, आरबीडीसी पीटीई, ब्रुकफिल्ड अ‍ॅसेट मॅनजमेंट, मंत्रा डाटा सेंटर्स या कंपन्यांनी गुंतवणुकीची तयारी दर्शविली आहे.

देशातील डाटा इंडस्ट्रीची सध्याची क्षमता ४४७ एमडब्ल्यू आहे. वाढती गुंतवणूक पाहता ही क्षमता २०२३ पर्यंत १००७ एमडब्ल्यू होणार आहे. भविष्यात फाईव्ह जी तंत्रज्ञान, आयओटी लिंकड डिव्हायसेज, डाटा लोकलायझेशन आणि क्लाऊड अ‍ॅडॉप्शन यामुळे डाटाची मागणी सातत्याने वाढत आहे.

भारतातील डाटा सेंटर्स उद्योगामध्ये ३.७ बिलीयन अमेरिकन डॉलरची गुंतवणूक होण्याची गरज आहे. त्याचबरोबर ६० लाख चौरस फुट जमीन विकसित करावी लागणार आहे.उत्तर प्रदेश सरकारने माहिती तंत्रज्ञान उद्योगाला अनेक सवलती दिल्या आहेत. त्यासाठी आक्रमक धोरण आखले आहे. त्यामुळे लवकरच उत्तर प्रदेश देशातील महत्वाचे डाटा सेंटर बनणार आहे.

यासाठी सरकारने बहुतांश कंपन्यांशी बोलणी सुरू केली आहेत. कोरोनामुळे अधिकृत परवानगी देण्यात आली नसली तरी लवकरच काम सुरू होणार आहे. उत्तर प्रदेशात अनेक कंपन्यांनी डाटा सेंटर उभारण्यासाठी परवानगी मागितली आहे. त्यामध्ये मायक्रोसॉफ्ट आणि गुगल यासारख्या बड्या कंपन्याही आहेत. या कंपन्यांशी लवकरच करार करण्यात येणार आहेत.

Business in Uttar Pradesh, 13 companies to invest Rs 22,000 crore to set up data centers in Noida, Hyderabad, Bangalore

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात