महाराष्ट्राच्या “जॅम पॅक्ड पोलिटिकल स्पेस”मध्ये केसीआर चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीला संधी किती??


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय अवकाशात आधीच राष्ट्रीय आणि प्रादेशिक स्थानिक पक्षांची भरमार असताना आज नव्याने महाराष्ट्रात दाखल झालेल्या केसीआर चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीला मूळात संधी किती??, कशी?? आणि कुठे??, हे प्रश्न उपस्थित होत आहेत. BRS : How can bharat rashtra samiti will establish itself in politically jam packed maharashtra??

केसीआर चंद्रशेखर राव यांनी आधी जाहीर केल्याप्रमाणे आज 5 फेब्रुवारी 2023 रोजी त्यांनी आपला भारत राष्ट्र समिती हा पक्ष महाराष्ट्रात आणला. नांदेडमध्ये महासभा घेऊन त्याची रुजवत केली. नेहमीप्रमाणे त्यांनी केंद्रातल्या मोदी सरकारवर निशाणा साधला, पण महाराष्ट्रात प्रवेशाची भूमी निवडताना मात्र चंद्रशेखर राव यांनी शंकरराव चव्हाण आणि अशोक चव्हाण यांचा काँग्रेसी बालेकिल्ला निवडला. आणीबाणीचा मुद्दा कडून काँग्रेस आणि चव्हाण कुटुंबीयांना डिवचले. वास्तविक नांदेड सोडून तेलंगणला लागून असलेल्या एखादा जिल्हा अथवा एखादे शहर त्यांना जरूर निवडता आले असते. पण त्यांनी नांदेडची निवड केली. यामध्ये त्यांचे भाजपवर निशाणा साधण्यापेक्षा काँग्रेसला डिवचण्याचे कौशल्य अधिक दिसले!!

पण प्रश्न त्यापलिकडचे आहेत. सध्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय पातळीवरचे आणि प्रादेशिक पातळीवरचे तसेच स्थानिक असे भरपूर पक्ष असताना नव्याने राष्ट्रीय पातळीवर पोहोचत असलेल्या भारत राष्ट्र समितीला महाराष्ट्राच्या राजकीय भूमीमध्ये किती, कशी आणि कुठे संधी मिळणार??, हे आहेत!!

राष्ट्रीय पक्ष काँग्रेस आणि भाजप हे 100 च्या आसपास विधानसभेच्या जागा मिळवणारे दोनच पक्ष आहेत. बाकी कोणत्याही पक्षाने महाराष्ट्रात विधानसभेची शंभरी कधीच गाठली नाही. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन बलाढ्य पक्ष देखील विधानसभेची शंभरी ओलांडू शकलेले नाहीत. काँग्रेस वर्षानुवर्षे सत्ताधारी पक्ष राहिल्याने आणि त्यावेळी विरोधी पक्ष फारच कमकुवत असल्याने काँग्रेसने अनेकदा म्हणजे किमान 5 – 7 वेळा विधानसभेची शंभरी जरूर गाठली. पण 1999 नंतर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यावर खुद्द काँग्रेस सारख्या पक्षाला देखील विधानसभेची शंभरी कधीही गाठता आलेली नाही. उलट आता काँग्रेस सारखा बलाढ्य राष्ट्रीय पक्ष महाराष्ट्रात चौथ्या क्रमांकाचा पक्ष बनून राहिला आहे.

भाजपची अवस्था सुरुवातीला तर प्रादेशिक पक्षापेक्षाही छोटी होती. पण पक्षाचा राजकीय आणि सामाजिक बेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा असल्याने तत्वज्ञानात्मक पातळीवर व्यापकता मोठी होती. त्यामुळे भरपूर प्रयत्न केल्यानंतर भाजप महाराष्ट्रात नुसता स्थिरावला असे नाही, तर तो प्रचंड फोफावला आणि सुरुवातीला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली घवघवीत यश मिळवता झाला. पण ते यश देखील शंभरीच्या आतलेच राहिले होते. 2014 नंतर नरेंद्र मोदींचे करिश्माई नेतृत्व लाभल्यानंतर भाजपने राजकीय कात टाकली आणि 2014, 2019 या दोन निवडणुकांमध्ये शंभरी पार केली.

पण काँग्रेस आणि भाजप हे दोनच पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात विधानसभा निवडणुकीत शंभरी पार केलेले पक्ष आहेत. अखंड शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, दोन्ही कम्युनिस्ट पार्टी, वेगवेगळ्या शेतकरी संघटना राष्ट्रीय समाज पक्ष आणि आता आम आदमी पार्टी हे सगळेच पक्ष विधानसभेत फार तर डबल डिजिट किंबहुना सिंगल डिजिट एवढीच कामगिरी करू शकले आहेत!!

त्यातही शेतकरी कामगार पक्ष, दोन्ही कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी संघटना, रिपब्लिकन पार्टीचे सगळे गट हे तर किरकोळ आणि तोळामासा राजकीय तब्येत असलेले राहिले आहेत. रिपब्लिकन पार्टीचे सगळेच नेते बडे. देशभरात नाव असलेले. पण राजकीय ताकदीच्या बाबतीत परावलंबी राहिले आहेत.

संघटनात्मक पातळीवर तर शिवसेना मग अखंड असो अथवा फुटलेली असो आणि राष्ट्रवादी काँग्रेस या आपापल्या गडांमध्ये मजबूत. पण गड सोडला की कमकुवत, असे राहिले आहेत.

काँग्रेस आणि भाजप हे दोनच पक्ष महाराष्ट्रात सर्वदूर पसरलेले पक्ष आहेत.

महाराष्ट्रात मनसे सारखा पक्ष ज्याने सुरुवातीला मोठी झेप घेतली. पण नंतर तो अक्षरशः आकुंचन पावला. संघटनात्मक दृष्ट्या मनसे इतकी वाताहत क्वचित दुसऱ्या पक्षाची झाली असेल. राज ठाकरेंसारखा नेता प्रचंड क्षमतेचा. पण संघटना प्रचंड अक्षमतेची, अशी मनसेची अवस्था आहे!!

एवढ्या मोठ्या राजकीय पटलावर चंद्रशेखर राव यांची भारत राष्ट्र समिती महाराष्ट्राच्या राजकीय भूमीत अथवा राजकीय नकाशात नेमकी कुठे कशी आणि किती बसणार??, हे मूलभूत प्रश्न आहेत. शिवाय भारत राष्ट्र समितीची संघटना वाढवण्यासाठी त्यांना महाराष्ट्राच्या भूमीतला एखादा नावाजलेला नेता तरी कसा मिळणार??, हाही त्या पुढचा प्रश्न आहे. पण असे असले तरी भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्रात नांदेड मार्गे राजकीय एन्ट्री केली आहे. आता तिची वाटचाल पुढे कशी होते आणि महाराष्ट्रातली आव्हाने ती कशी पेलते??, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

BRS : How can bharat rashtra samiti will establish itself in politically jam packed maharashtra??

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात