मुंबई महापालिका उभारणार देशातील पहिले बेबी गार्डन


विशेष प्रतिनिधी

मुंबई – मुंबई महापालिका मुंबई सेंट्रल स्थानकाजवळील आग्रीपाडा येथे पहिले बेबी पार्क तयार करत आहे. कोविड काळात मोकळ्या जागांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. त्यामुळे पालिकेने पहिले बेबी गार्डन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या बेबी गार्डनमध्ये लहान मुलांना बागडण्यासाठी स्वतंत्र जागा तयार करण्यात येणार आहे. तसेच तरुण आणि ज्येष्ठांसाठी खुली व्यायामशाळा आहे.BMCC will start baby garden

बेबी गार्डनमधील दिवे, बाकेही आकर्षक पद्धतीने तयार करण्यात येणार आहेत. तसेच संरक्षक जाळ्याही त्याच पद्धतीने बनविण्यात येणार आहेत. स्वच्छतेच्या दृष्टीने कचऱ्याचे डबेही तयार करण्यात येणार आहेत.



लहान मुलांसाठी आकर्षित झाडेही लावण्यात येणार आहेत. या कामाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. यासाठी दोन कोटी ४९ लाखांचा खर्च अंदाजित आहे. महापालिकेकडून कार्यादेश मिळाल्यानंतर दीड वर्षामध्ये हे उद्यान तयार केले जाणार आहे. बालकांना दूध पाजण्यासाठी स्वतंत्र खोलीची सुविधाही असणार आहे,

तसेच उद्यानातील पदपथ ‘रफ कोटा अथवा जैसलमेर’ दगडांचा बनवण्यात येणार आहे. खुल्या व्यायामशाळेबरोबरच या उद्यानात योगा केंद्रही तयार करण्यात येणार आहे. हे संपूर्ण उद्यान बालकांपासून ज्येष्ठ नागरिकांना वापरता येईल, अशा पद्धतीने तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे मोठ्या मुलांच्या खेळण्यासाठी जागा असेल, त्याचबरोबर स्वच्छतागृहदेखील असणार आहे.

BMCC will start baby garden

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात