भाजप ‘विजया’चा हुकमी एक्का ‘सायलेंट वोटर‘; बंगालमध्ये ४९% महिला गेम चेंजर!बंगालच्या ‘दीदी‘ला रोखण्यात महाराष्ट्राच्या ‘ताई‘चाही खारीचा वाटा

  • बंगालमधील नवीन मतदार यादीनुसार, 7.18 कोटी मतदारांपैकी 3.15 कोटी म्हणजेच सुमारे 49 टक्के महिला आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांचा या मतांवर डोळा आहे.

  • भाजपाच्या पश्चिम बंगालमध्ये विजयाच्या दाव्यामागील मोठे कारण महिला मतदार आहेत.

  • बंगालमध्ये निवडणुका आता कुठे रंगात आली आहे. प्रचार सभा, प्रचार रॅली, कॉर्नर मीटिंगपासून ते प्रत्यक्ष भेटीगाठीवर कार्यकर्ते आपल्याच उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन करत आहेत.  पश्चिम बंगालच्या या निवडणुकीत महिला कोणाच्या बाजूनं उभा राहतील याची अधिक चर्चा आहे आणि याच मतावर तृणमूल आणि भाजपाचा डोळा आहे.

  • पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या उमेदवारांमध्ये 3 महिलांसह 8 मुस्लिम उमेदवारांचा समावेश आहे .  मुस्लिम महिलांपैकी, राणीनगर विधानसभा मतदारसंघातील मसुहारा आणि डोमकल विधानसभा मतदारसंघातील रुबिका खातून तर माफुजा खातून या सागरडीघी येथून उमेदवार आहेत.

  • बंगालमधील हिटलर दीदींची जुलमी राजवट फेकून देण्यासाठी भाजपकडे दोन ब्रह्मास्त्रे आहेत. एक म्हणजे मोदी आणि दुसरे महिला मतदार. महिलांमध्ये मोदींची लोकप्रियता अफाट आहे, हे वारंवार स्पष्ट झाले आहे. कारण मोदींच्या सर्व योजनांमध्ये महिला केंद्रबिंदू आहेत. BJP’s ‘victory’ dictatorial unit ‘Silent Voter’ ; Maharashtra’s ‘Tai’ to stop Bengal’s ‘Didi’ ; 49% of women in West Bengal will be game changers

विशेष प्रतिनिधी

कोलकाता : पश्चिम बंगाल निवडणूक 2021 चा हाय व्होल्टेज ड्रामा-निवडणुकीचा प्रचार-वार पलटवार-सोनार बांग्ला-बंगाल की बेटी-योजना-आश्वासनं-दिदी-दादा- खैला होबे -ममता जाछे भाजपा आसछे ह्या शब्दांनी बंगालमध्ये तुफानी रणधूमाळी सुरू आहे.

ममता बॅनर्जी यांना रोखण्यासाठी भाजपने बंगालच्या ‘सायलेंट वोटर्स ‘कडे विशेष लक्ष वेधले आहे. या सायलेंट वोटर्सला सांभाळण्याची जबाबदारी देखील भाजपच्या सायलेंट व्यक्तीकडे सोपविण्यात आली आहे.

सायलेंट वोटर्स म्हणजे महिला ज्या तब्बल 49% असून पश्चिम बंगालच्या सत्तेच्या चाब्या ‘महिला राज’ कडेच आहेत.असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

पश्चिम बंगालमध्ये दिदींना टक्कर देण्यास भाजपच्या महिला ब्रिगेडचा चेहरा म्हणजे महाराष्ट्रातील ताई विजया रहाटकर .त्या भाजपच्या राष्ट्रिय सचिव आहेत .त्यांनी पश्चिम बंगालमध्ये प्रचाराचा धडाका लावला आहे.

तळागाळातील महिला मतदारांना त्या भेटत आहेत.त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. कारण ह्याच महिला मतदार सत्तांतर घडवण्यासाठी महत्त्वाचा फॅक्टर ठरणार.

राजकीय विश्लेषकांचा असा विश्वास आहे की देशातील इतर राज्यांप्रमाणे बंगालच्या महिला केवळ पती किंवा घरातील प्रमुखांच्या सूचनेनुसार मतदान करत नाहीत. राजकीयदृष्ट्या जागरूक या महिलांना त्यांची स्वतःची मते आणि समजूतदारपणा देखील आहे. तर, काही विभाग वगळता बहुतेक घरातच महिला स्वत: च्या मतांचा निर्णय घेतात.

पश्चिम बंगालमध्ये टीएमसी आणि भाजप दोन्ही पक्ष महिला मतदारांचा पाठिंबा मिळविण्याच्या प्रयत्नात महिलांशी संबंधित मुद्दे उपस्थित करीत आहेत. या रणनीतीनुसार देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे माजी अध्यक्ष अमित शहासह पंतप्रधान नरेंद्र मोदी या ‘सायलेंट वोटर्सला’ प्राधान्य देत आहेत.

महिला नोकरदारांना सरकारी नोकरीत33% आरक्षण  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी भाजपचे संकल्प पत्र जाहीर केले.महिलांना 33 टक्के नोकर्‍या मिळतील. आरक्षण देण्यात येईल. त्याचबरोबर, बंगालमधील 282 पैकी 36 महिलांना भाजपने आतापर्यंत तिकिटे दिली आहेत.

भाजपचे विधवा पेन्शन 3 हजार रुपये देण्याचे आश्वासन 

पश्चिम बंगालच्या निवडणूक जाहीरनाम्यात त्यांनी विधवा पेन्शन 1000 रुपयांवरून 3000 रुपयांपर्यंत वाढवण्याचे आश्वासन दिले आहे. तथापि, कोणत्याही भाजपा शासित राज्यात अद्याप विधवा महिलांना तीन हजार रुपयांचे पेन्शन दिले जात नाही.

मध्य प्रदेशातील महिलांचा भाऊ आणि काका म्हणून ओळखले जाणारे शिवराज सिंग यांचे सरकार विधवा पेन्शन म्हणून 600 रुपये पेन्शन देते तर उत्तर प्रदेशात तीनशे रुपये दिले जातात. तथापि, मनोहर लाल खट्टर हे हरियाणामधील एकमेव भाजप सरकार आहे, जे 1 एप्रिलपासून विधवा निवृत्तीवेतन दरमहा 2250 रुपये देतील. पूर्वी ती दरमहा 2 हजार रुपये देत होती.

भाजपा सार्वजनिक वाहतुकीत मोफत प्रवासाचे आश्वासन
बंगालमधील सार्वजनिक वाहतुकीत महिलांना मोफत प्रवासाचे आश्वासन भाजपाने दिले आहे . एवढेच नव्हे तर भाजपने मुलींना केजी ते पीजी पर्यंत मोफत शिक्षण देण्याचे आश्वासनही दिले आहे, जे अत्यंत महत्वाचे आणि महत्त्वपूर्ण मानले जात आहे. बंगालच्या राजकारणात महिलांची खूप महत्वाची भूमिका असते.

बंगालमधील महिला मतदारांची भूमिका

बंगालमधील 7.18 कोटी मतदारांपैकी 3.15 कोटी म्हणजेच सुमारे 49 टक्के महिला आहेत. राज्यातील मतदारांमधील पुरुषांमधील स्त्रियांचे प्रमाण गेल्या वर्षी प्रति हजार 956 च्या तुलनेत 961 पर्यंत वाढले आहे. ही एक नवीन नोंद आहे. ही आकडेवारी इतकी मोठी आहे की त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे कोणत्याही पक्षाला परवडणारे नाही. अशा परिस्थितीत या विधानसभा निवडणुकीत सत्तेची गुरुकिल्ली महिलांच्या हाती आहे, असे म्हणणे योग्य ठरेल.2019 च्या लोकसभा निवडणुकीत महिला मतदारांमध्ये भाजपच्या प्रवेशानंतर सत्ताधारी टीएमसीने त्यांना पुन्हा आपल्या गोटात खेचण्याचा प्रयत्न तीव्र केला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पडलेल्या धक्क्यांनंतर ममता बॅनर्जी यांनी आपल्या सरकारच्या विकास योजना आणि भाजपा शासित राज्यांमधील महिलांवरील गुन्हेगारीतील वाढीच्या घटनांविषयी लोकांना सांगण्यासाठी पक्षाच्या बिगर राजकीय आघाडीला ‘बोंगो जननीची ‘ स्थापना केली होती. अशा परिस्थितीत भाजपा आणि टीएमसीमध्ये या वेळी महिलांची मने कोण जिंकतात हे पाहणे महत्वाचे ठरेल.

दुसरीकडे, ममता यांनी सायकल योजना आणि आरोग्य योजनेद्वारे महिलांवर आपले वर्चस्व कायम राखण्याचा प्रयत्न केला आहे. त्या आज देशातील एकमेव महिला मुख्यमंत्री आहेत. आणि थेट मोदी-शहा यांना आव्हान देणार आहेत. लोकसभा निवडणुकीतही त्यांनी 40 टक्के महिला उमेदवारांना तिकिट दिले. या विधानसभेतही त्यांनी 294 जागांवरील 50 महिलांना तिकिटे दिली आहेत.

भाजपला विश्वास आहे की महिला यावेळी ममता यांना नव्हे तर पंतप्रधान मोदींची  मेहनती प्रतिमा पाहून मतदान करतील. बिहार निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदींनी असा दावा केला होता की महिला भाजपच्या मूक मतदार आहेत आणि त्यांना नेहमी विजयाच्या उंबरठ्यावर आणतात

भाजपनं दिल भांडी घासण्याचे काम करणाऱ्या महिलेला तिकीट

पश्चिम बंगालमध्ये येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केले जाईल. त्याचबरोबर यापूर्वीही राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांना तिकीट देत आहेत. मात्र या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने तिकिट वितरणात अनेक आश्चर्यकारक निर्णय घेतले आहेत. या निर्णयापैकी एक म्हणजे या वेळी विधानसभा निवडणुकीत भाजपाने अशा स्त्रीला उमेदवार बनवून दिले आहे जी भांडी घसण्याचे करण्याचे काम करते.

पश्चिम बंगाल निवडणुकीत या वेळी भाजपामध्ये भांडी घासणार्‍या एका महिलेला भाजपचे उमेदवार करण्यात आलं आहे.  या महिलेकडे फक्त 6 साड्या असून तिचे उत्पन्न सुमारे 3 हजार रुपये आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाने तिकीट दिलेले तिचे नाव कलिता माझी असं आहे.  गेल्या दोन दशकांपासून कालिता भांडी घसण्याचे काम करतात. ती एका शेतकर्‍याची मुलगी आणि प्लंबरची बायको आहे. त्यामुळे खैला होबे म्हणणाऱ्या ममतांचा खेळ होणार की भाजपचा, याचं उत्तर निवडणुकीच्या निकालानंतर मिळेल. एवढं मात्र निश्चित आहे की पश्चिम बंगाल निवडणुकीत सत्तेच्या चाब्या फक्त महिलांच्या हाती आहेत.

BJP’s ‘victory’ dictatorial unit ‘Silent Voter’ ; Maharashtra’s ‘Tai’ to stop Bengal’s ‘Didi’ ; 49% of women in West Bengal will be game changers

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*